Join us  

Mystery girl IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya च्या संघाला चिअर करण्यासाठी मिस्ट्री गर्ल स्टेडियमवर पोहोचली, शिट्ट्या वाजवताना दिसली, Photo 

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये म्हटलं की ग्लॅमर आलंच... देशातील तसेच जगभरातील स्टार्स क्रिकेटपटूंना एकत्र खेळताना पाहण्याचं हे चाहत्यांचं हक्काचं व्यासपीठ.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 6:49 PM

Open in App

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये म्हटलं की ग्लॅमर आलंच... देशातील तसेच जगभरातील स्टार्स क्रिकेटपटूंना एकत्र खेळताना पाहण्याचं हे चाहत्यांचं हक्काचं व्यासपीठ. त्यामुळे ही संधी सहसा कुणी सोडत नाही. त्यात कॅमेरामनही 'सुंदर' चेहरा टिपण्यासाठी सज्जच असतो. आयपीएल २०२२त आतापर्यंत अनेक मिस्ट्री गर्ल दिसल्या. त्यापैकी एकतर अभिनेत्री निघाली.. त्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यात मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली. ती बहुतेक हार्दिक पांड्याच्या संघाची फॉलोअर असावी आणि GTसाठी ती शिट्ट्या मारतानाही दिसली. 

१५६ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले. नितीश राणा ( २) काहीच कमाल दाखवू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांनी KKR चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यश दयालने GT ला मोठे यश मिळवून देताना अय्यरला ( १२) बाद केले. त्यापाठोपाठ त्याने रिंकू सिंगचाही ( ३५) अडथळा दूर केला. १३व्या षटकात यश दयालने KKRच्या आंद्रे रसेलची विकेट मिळवलीच होती, परंतु दुर्दैवाने तो No Ball ठरला. रसेलला १० धावांवर जीवदान मिळाले. 

दरम्यान मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली.

सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा (२५) व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर ( २७) व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान ( ०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची ( १७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर भन्नाट कॅच घेत आंद्रेने गुजरातची वाट लावली. त्याने २०व्या षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. गुजरातला ९ बाद १५६ धावा करता आल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सकोलकाता नाईट रायडर्सहार्दिक पांड्या
Open in App