Venkatesh Iyer Wicket IPL 2022 GT vs KKR Live Updates : तिसऱ्या अम्पायरने चुकीचा निर्णय दिला?; वेंकटेश अय्यरच्या विकेटवरून संमिश्र प्रतिक्रिया, Video 

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत अम्पायरचा वादग्रस्त निर्णय चर्चेत असताना आजही असेच काहीसे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:14 PM2022-04-23T19:14:47+5:302022-04-23T19:15:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 GT vs KKR Live Updates : Venkatesh Iyer Wicket; How tight is that, do you think Abinav Manohar foot was touching the rope?  Excellent pressure catch by Abhinav Manohar, Video  | Venkatesh Iyer Wicket IPL 2022 GT vs KKR Live Updates : तिसऱ्या अम्पायरने चुकीचा निर्णय दिला?; वेंकटेश अय्यरच्या विकेटवरून संमिश्र प्रतिक्रिया, Video 

Venkatesh Iyer Wicket IPL 2022 GT vs KKR Live Updates : तिसऱ्या अम्पायरने चुकीचा निर्णय दिला?; वेंकटेश अय्यरच्या विकेटवरून संमिश्र प्रतिक्रिया, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत अम्पायरचा वादग्रस्त निर्णय चर्चेत असताना आजही असेच काहीसे पाहायला मिळाले. गुजरात टायटन्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था बिकट झाली होती. त्यात अगदी मोक्याच्या क्षणाला वेंकटेश अय्यरची ( Venkatesh Iyer Wicket ) विकेट पडली. अभिनव मनोहरने सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. मैदानावरील अम्पायर या झेलबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांनी तिसऱ्या अम्पायरची मदत मागितली. रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या अम्पायरने वेंकटेशला बाद ठरवले, परंतु काहींच्या मते मनोहरचा पाय सीमारेषेला टच झाल्याचे दिसत होते. यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  

१५६ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले. नितीश राणा ( २) काहीच कमाल दाखवू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांनी KKR चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यश दयालने GT ला मोठे यश मिळवून देताना अय्यरला ( १२) बाद केले. त्यापाठोपाठ त्याने रिंकू सिंगचाही ( ३५) अडथळा दूर केला. १३व्या षटकात यश दयालने KKRच्या आंद्रे रसेलची विकेट मिळवलीच होती, परंतु दुर्दैवाने तो No Ball ठरला. रसेलला १० धावांवर जीवदान मिळाले.  

रसेलने वेंकटेश अय्यरसह डाव सावण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनव मनोहरने अफलातून झेल घेत ही जोडी तोडली. राशिद खानच्या गोलंदाजीवर वेंकटेशने मारलेला फटका मनोहरने सीमारेषेवर टिपला. तिसऱ्या अम्पायरने मनोहरचा पाय सीमारेषेला चिकटलाय का हे चेक केले आणि त्यानंतर  आऊट जाहीर केले.  या निर्णयावरूनही नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राशिदचे ही आयपीएलमधील १००वी विकेट ठरली आणि सर्वात कमी ८३ डावांत १०० विकेट्स घेणाऱ्या अमित मिश्राच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. शिवम मावीलाही ( २) राशिदने त्रिफळाचीत केले.

 

पाहा व्हिडीओ... 

Web Title: IPL 2022 GT vs KKR Live Updates : Venkatesh Iyer Wicket; How tight is that, do you think Abinav Manohar foot was touching the rope?  Excellent pressure catch by Abhinav Manohar, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.