Join us  

Andre Russell IPL 2022 GT vs KKR Live Updates : W, W, 1, 4, W,W! आंद्रे रसेलने २०व्या षटकात इतिहास रचला; Hardik Pandyaच्या मेहनतीवर पाणी 

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 5:25 PM

Open in App

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाही. गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने आज अर्धशतकी खेळी करून कोलकाता नाईट रायडर्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण, १७व्या षटकानंतर हार्दिकला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. तरीही तो एकटा भिडला. टीम साऊदीने तीन विकेट्स घेत गुजरातला आधीच धक्के दिले होते, परंतु आंद्रे रसेलने ( Andre Russell) २०व्या षटकात  चित्रच बदलले. पहिल्या दोन व शेवटच्या दोन अशा चार विकेट्स घेत त्याने कोलकाताला पुनरागमन करून दिले. 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला. गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( GT vs KKR) लढतीत हार्दिकच्या निर्णयाचा संघाला दुसऱ्याच षटकात फटका बसला. सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने ही जोडी तोडली आणि सहा २५ धावांवर माघारी परतला. हार्दिकने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२२मध्ये तीन अर्धशतक करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. 

डेव्हिड मिलरने आल्याआल्या षटकार खेचला, वरुण चक्रवर्तीकडून सीमारेषेवर त्याचा झेल सुटला. मिलर व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. १७व्या षटकात शिवम मावीने ही डोईजड झालेली भागीदारी तोडली. मिलर १ चौकार व २ षटकारांसह २७ धावांवर माघारी परतला. हार्दिक तंदुरुस्त दिसत नाही, त्याने १७व्या षटकानंतर फिजिओकडून प्राथमिक उपचार घेतले. ( Hardik Pandya looks uncomfortable. Physio treating him at the end of 17th over. ) टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान ( ०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

२०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची ( १७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर भन्नाट कॅच घेत आंद्रेने गुजरातची वाट लावली. त्याने २०व्या षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. गुजरातला ९ बाद १५६ धावा करता आल्या. २०व्या षटकात चार विकेट्स घेणारा तो आयपीएल २०२२ इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला.  

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्स
Open in App