IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : लखनौ सुपर जायंट्सनी आज हातचा सामना गमावला. १३६ धावांचे सोपे लक्ष्य लखनौला गाठता आले नाही आणि गुजरात टायटन्सने रोमहर्षक विजयाची नोंद केली. मोहित शर्माने टाकलेल्या २०व्या षटकात सलग चार चेंडूवर चार फलंदाज माघारी परतल्याने LSGला ७ धावांनी हार मानावी लागली. या पराभवानंतर LSGचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्यावर माजी गोलंदाज वेंकटेश अय्यरने टीका केली.
लखनौच्या खेळपट्टीवर गुजरातच्या फलंदाजांचा कस लागला. लखनौने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना गतविजेत्यांना ६ बाद १३५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. वृद्धीमान साहा (४७) आणि हार्दिक पांड्या ( ६६) यांची चांगली फलंदाजी केली. कृणाल पांड्याने ( ४-०-१६-२) उत्तम गोलंदाजी केली. मार्कस स्टॉयनिसनेही ३-०-२०-२ अशी स्पेल टाकली. लोकेश राहुलने चांगली फटकेबाजी केली, परंतु अन्य फलंदाजांनी निराश केले. ३० चेंडूंत ३५ धावा LSGला करायच्या होत्या, परंतु त्यांच्या फलंदाजांनी माना टाकल्या. अहमद नूरने ४-०-१८-२ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. लोकेश ६१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६८ धावांवर बाद झाला. मोहितने ३-०-१७-२ अशी गोलंदाजी केली.
या पराभवानंतर वेंकटेशने ट्विट केले. त्याने लिहिले की, ३० चेंडूंत ३५ धावांची गरज होती आणि ९ विकेट्स हातात असतानाही लखनौची फलंदाजी सुमार झाली. २०२०मध्ये पंजाब किंग्ससोबत असेच काही सामन्यांत घडले होते. गुजरातने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, हार्दिक पांड्याने चतुर्ण नेतृत्व दाखवले, तर लखनौचा बिनडोकपणा दिसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"