Join us  

IPL 2022, GT vs LSG Live : पांड्या बंधू चमकले! हार्दिकने फलंदाजीत, कृणालने गोलंदाजी रडवले; गुजरात टायटन्सना १३५ धावांवर रोखले

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : संथ खेळपट्टीवर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा चांगलाच कस लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 5:14 PM

Open in App

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : संथ खेळपट्टीवर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा चांगलाच कस लागला. लखनौ सुपर जायंट्सने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना गतविजेत्यांच्या धावांवर अंकुश ठेवला होता. वृद्धीमान साहाने चांगली फलंदाजी केली, तर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मैदानावर टीकूनही GTला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकला नाही. कृणाल पांड्याने ( ४-०-१६-२) उत्तम गोलंदाजी केली. 

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३  मधील आजचा सामना होत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या GTला मागील सामन्यात हार पत्करावी लागली होती आणि त्यांचा पुन्हा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न असणार आहे, तर LSG विजयी मालिका कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर उतरली आहे. KL Rahul ने दुसऱ्याच षटकात कृणाल पांड्याला गोलंदाजीला आणले अन् त्याने  शुबमन गिलची ( ०) विकेट मिळवून दिली. वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्या यांनी GT चा डाव सावरताना LSGच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. गुजरातच्या पॉवर प्लेमधील ४० पैकी ३४ धावा या साहानेच केल्या. गुजरातची ही पॉवर प्लेमधील निचांक धावसंख्या ठरली.

साहा आणि हार्दिक गुजरातचा डाव सांभाळून होते, परंतु त्यांच्या धावांच्या गतीवर लखनौच्या गोलंदाजांनी नियंत्रण ठेवले होते. १० षटकांत त्यांना ७१ धावांपर्यंत मजल मारता आली. ११व्या षटकात पुन्हा कृणालला गोलंदाजीवर आणले व त्याने ही ६८ धावांची भागीदारी करणारी जोडी तोडली. साहा ३७ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४७ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच षटकात अमित मिश्राच्या संथ फिरकी चेंडूवर अभिनव मनोहर ( ३) झेलबाद झाला. नवीन उल हकने सुरेख झेल टिपला. LSGचे फिरकी गोलंदाज चांगला चेंडू टाकत होते आणि त्यामुळे GT च्या फलंदाजांवर दडपण वाढताना दिसले. हार्दिक मैदानावर होता, परंतु त्यालाही धावांचा वेग वाढवण्यात अपयश येत होते. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात विजय शंकर ( १०) नवीन उल हकच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. 

हार्दिकने ४४ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. १८वे षटक रवी बिश्नोईला देण्याचा राहुलचा डाव फसला अन् हार्दिकने त्यावरच खणखणीत फटके खेचून १९ धावा जोडल्या. हार्दिक ५० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. गुजरातने ६ बाद १३५ धावा केल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यालखनौ सुपर जायंट्स
Open in App