Join us  

Darshan Nalkande, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा विदर्भाचा 'वाघ' गुजरात टायटन्सने मैदानावर उतरवला, हार्दिक पांड्याने विश्वास दाखवला 

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन  प्रीमिअर लीगमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:20 PM

Open in App

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन  प्रीमिअर लीगमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या गुजरातने ( GT) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (  Gujarat Titans opt to bowl first ). पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात जॉनी बेरस्टोला ( jonny Bairstow )  संधी दिली आहे, तर गुजरातच्या ताफ्यात दर्शन नळकांडे व साई सुदर्शन यांची अंतिम  ११मध्ये निवड झाली आहे. दर्शन नळकांडे आयपीएलमधील पहिलाच सामना खेळणार आहे. 

कोण आहे दर्शन नळकांडे?

  • ४ ऑक्टोबर १९९८मध्ये विदर्भात दर्शनचा जन्म... २०१८-१९मध्ये त्याने विदर्भ संघाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर १ नोव्हेंबरला रणजी करंडक स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याचे पदार्पण झाले. २०१८मध्ये पंजाब किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं, परंतु त्याला संधी मिळाली नाही. २१ फेब्रुवारी २०१९मध्ये त्याने सय्यद मुश्कात अली ट्रॉफीतून विदर्भकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर  आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. 
  • नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दर्शन नळकांडेने (Darshan Nalkande)  कर्नाटकविरुद्ध चार चेंडूंत चार विकेट्स घेतल्या आणि लसिथ मलिंगा, राशिद खान आदी दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले.
  • दर्शननं २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनिरुद्ध जोशी ( १),  तिसऱ्या चेंडूवर बीआर शरथ ( ०), चौथ्या चेंडूवर जगदीशा सुचिथ ( ०) व पाचव्या चेंडूवर अभिनव ( २७) याची विकेट घेतली. हे चारही फलंदाज झेलबाद झाले. मुश्ताक अली ट्रॉफीच्या एकाच पर्वात एकाच संघाकडून दोन हॅटट्रिक नोंदवल्या गेल्याची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी अक्षय कार्नेवारनं सिक्किमविरुद्ध  हॅटट्रिक घेतली होती.
  • मुश्ताक अली ट्रॉफीत चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा दर्शन हा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथूननं २०१९च्या उपांत्य फेरीत हरयाणाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. या दोघांनीही २०व्या षटकात हा पराक्रम केला. 

ट्वेंटी-२०त चार चेंडू चार विकेट्स घेणारे गोलंदाजजिम अॅलेनबी - २००८आंद्रे रसेल - २०१३अल-आमीन होसैन - २०१३राशिद खान - २०१९लसिथ मलिंगा - २०१९अभिमन्यू मिथून - २०१९शाहिन आफ्रिदी- २०२०कर्टीस  कॅम्फेर - २०२१दर्शन नळकांडे - २०२१

 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सविदर्भपंजाब किंग्स
Open in App