Join us  

What a catch, Hardik Pandya IPL 2022 GT vs PBKS Live Updates : हार्दिक पांड्या हे तू काय केलंस?; एवढा भारी कॅच घेऊनही काहीच फायदा नाही झाला, Video

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने दमदार सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 8:32 PM

Open in App

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने दमदार सुरुवात केली. पण, शिखर धवन व लाएम लिव्हिंगस्टोन या जोडीने पंजाबला वापसी मिळवून दिली. हार्दिकने ( Hardik Pandya) ही जोडी तोडण्यासाठी राशीद खानला गोलंदाजीला आणले आणि त्यावर लिव्हिंगस्टोनचा अप्रतिम झेल पांड्याने टिपलाही. पण, एका चुकीमुळे लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले.   पंजाब किंग्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने नव्या चेंडूवर गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने १४१kmph च्या वेगाने चेंडू टाकून फिटनेस सिद्ध केलीच, शिवाय त्याच्या गोलंदाजीला आज चांगलीच धार दिसली. त्याने  त्याच्या पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल (  ५) याला बाद केले. आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा अडथळा ल्युकी फर्ग्युसनने दूर केला, राहुल तेवातियाने सुरेख झेल टिपला. पण, शिखर धवन ( Shikhar Dhawan) ने आज मोठा पराक्रम केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० चौकार मारण्याचा पराक्रम आज शिखर धवनने नावावर केला. हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला. या विक्रमात ख्रिस गेल ( ११३२), अॅलेक्स हेल्स ( १०५४), डेव्हिड वॉर्नर ( १००५),  आरोन फिंच ( १००४) हे आघाडीवर आहेत.   

पंजाबचे दोन फलंदाज ३४ धावांवर माघारी परतले असताना धवनने डाव सावरला. या दोघांनी दमदार फटकेबाजी करून ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. राशीदने टाकलेल्या ९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने लेग साईडला खणखणीत फटका मारला,  परंतु हार्दिकने  वेगाने धाव घेत हवेत झेपावत कॅच टिपला आणि गुजरातच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. पण, तो फारकाळ टिकला नाही... 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्सपंजाब किंग्स
Open in App