IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी करण्याचे धाडस हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) पुन्हा एकदा दाखवले. आजच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत गुजरात टायटन्सने ( GT vs PBKS) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय फसला, पांड्यासह गुजरातचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांवर माघारी परतले. त्यामुळे स्टार फलंदाज राहुल तेवातियाला ( Rahul Tewatia) मैदानावर लवकर यावे लागले. साई सुदर्शन हा एकाबाजूने गुजरातसाठी खिंड लढवत होता, परंतु राहुल त्याच्यावर खवळलेला दिसला. भर मैदानावर त्याने सहकारी फलंदाला सुनावले.
वृद्धीमान सहाने दमदार फटके मारून चांगली सुरूवात केली. पण शुबमन गिलच्या नशिबी पुन्हा अपयश आले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात तो ९ धावांवर रन आऊट झाला. रिषी धवनने भन्नाट थ्रो करताना गिलला माघारी जाण्यास भाग पाडले. ही धाव घेताना गोलंदाज संदीप शर्मा ( Sandeep Sharma) सोबत गिलची टक्कर झालेली पाहायला मिळाली आणि बाद होताच गिलने त्यावरून नाराजी व्यक्त केली. पण, यात संदीपची चूक नसल्याचे रिप्लेत समोर आले. वृद्धीमान चांगले फटके मारत होता. पण, कागिसो रबाडाने त्याला चौथ्या षटकात माघारी पाठवले. वृद्धीमानने ३ चौकार व १ षटकारासह २१ धावा केल्या.
कर्णधार
हार्दिक पांड्या सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. १ धावेवर रिषी धवनने त्याची विकेट घेतली. गुजरातचे आघाडीचे तीन फलंदाज ४४ धावांवर माघारी परतले. साई सुदर्शन व डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, लाएम लिव्हिंगस्टोनच्या फिरकीच्या जाळ्यात मिलर अडकला अन् ११ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. गुजरातचा स्टार फलंदाज राहुल तेवातिया मैदानावर आला. लिव्हिंगस्टोनच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर तेवातिया एक धाव घेण्यासाठी धावला, परंतु नॉन स्ट्रायकरला असलेल्या सुदर्शनकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. चेंडू पंजाबच्या खेळाडूच्या हातात असल्यामुले सुदर्शन धावला नाही. यावरून तेवातिया भडकलेला दिसला आणि त्याने लाईव्ह मॅचमध्ये सुदर्शनला सुनावले.
Web Title: IPL 2022, GT vs PBKS Live Updates : Rahul Tewatia gets angry on Sai Sudharsan, use abusive language?, know what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.