Join us  

Natasa Stankovic IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Rahul Tewatia चे दोन चेंडूंत दोन षटकार अन् Hardik Pandyaची पत्नी नताशा स्टँकोव्हिचचे 'सैराट' सेलिब्रेशन, Video 

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : २०२०च्या आयपीएलमध्ये राहुल तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार खेचून विजय मिळवून दिला होता आणि आज त्याने अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार खेचून बाजी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 12:05 AM

Open in App

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : राहुल तेवातियाने ( Rahul Tewatia) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली. २ चेंडूंत १२ धावांची गरज असताना गुजरात टायटन्सच्या डग आऊटमध्ये तणावाचे वातावरण होते. ओडिन स्मिथने २०व्या षटकात पहिली चार चेंडू इतकी भारी टाकली होती, की इथून पंजाब किंग्सला हरवणे जवळपास अशक्यच होते. पण, अनहोनी को होनी करने.... म्हणतात ना तेच घडले. पूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना राहुल तेवातियाने स्मिथची धुलाई केली होती आणि आज गुजरातसाठी त्याने तोच पवित्रा दाखवला आणि स्मिथने टाकलेले दोन चेंडू सीमापार भिरकावून गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

२०२०च्या आयपीएलमध्ये तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार खेचून विजय मिळवून दिला होता आणि आज त्याने अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार खेचून बाजी मारली ९६ धावांची खेळी करणाऱ्या शुबमन गिलला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तेवातियाच्या विजयी षटकाराने डग आऊटमध्ये बसलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने क्यूट स्माईल दिली. पण, तेच प्रेक्षकांमध्ये असलेल्या त्याच्या पत्नीने नताशा स्टँकोव्हिचने ( Natasa Stankovic) 'सैराट' सेलिब्रेशन केले. 

लाएम लिव्हिंगस्टोन ( ६४), शिखर धवन ( ३५), जितेश शर्मा ( २३) व राहुल चहर ( २२*) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने ९ बाद ८९ धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत टिच्चून मारा केला. त्यांनी केवळ ३७ धावा देताना चार विकेट्स या पाच षटकांत काढल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने सलग दोन विकेट्स घेतल्या, तर राशिद खानने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात शुबमन गिलने चांगली सुरुवात केली, परंतु मॅथ्यू वेडला (  ६) पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही.  गिल व पदार्पणवीर साई सुदर्शन यांनी खणखणीत फटकेबाजी केली. सुदर्शनने ( ३५) दुसऱ्या विकेटसाठी गिलसोबत ६८ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी केली.  

गुजरातला १८ चेंडूंत ३७ धावांची गरज होती. अर्षदीपने १८व्या षटकात केवळ ५ धावा दिल्या. १९व्या षटकात रबाडाने चार चेंडूंत ११ धावा दिल्याने पंजाब तणावाखाली गेले, परंतु पाचव्या चेंडूवर चतुराईने त्याने शुबमन गिलला बाद केले. गिल ५९ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ९६ धावांवर माघारी परतला. गुजरातला ६ चेंडूंत १९ धावांची गरज होती. ओडिन स्मिथने wide चेंडूने २०व्या षटकाची सुरूवात केली. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर डेव्हिड मिलर फटका मारण्यापासून चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक बेअरस्टोच्या हाती असताना नॉन स्ट्रायकर एंडवरून हार्दिक धाव घेण्यासाठी पळाला. पण, बेअरस्टोने त्याला ( २७) धावबाद केले.   २ चेंडूंत १२ धावा हव्या असताना राहुल तेवातियाने दोन खणखणीत षटकार खेचले व गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.  

टॅग्स :आयपीएल २०२२नताशा स्टँकोव्हिचगुजरात टायटन्सपंजाब किंग्स
Open in App