IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या गुजरातने ( GT) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Gujarat Titans opt to bowl first ). पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात जॉनी बेरस्टोला ( jonny Bairstow ) संधी दिली आहे, तर गुजरातच्या ताफ्यात दर्शन नळकांडे व साई सुदर्शन यांची अंतिम ११मध्ये निवड झाली आहे. दर्शन नळकांडे आयपीएलमधील पहिलाच सामना खेळणार आहे. विदर्भचा गोलंदाज दर्शन नळकांडेने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कर्नाटकविरुद्ध ४ चेंडूंत ४ विकेट्स घेत विक्रम घडवला होता.
पंजाब किंग्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने नव्या चेंडूवर गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने १४१kmph च्या वेगाने चेंडू टाकून फिटनेस सिद्ध केलीच, शिवाय त्याच्या गोलंदाजीला आज चांगलीच धार दिसली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल ( ५) याला बाद केले. आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा अडथळा ल्युकी फर्ग्युसनने दूर केला, राहुल तेवातियाने सुरेख झेल टिपला. पण, शिखर धवन ( Shikhar Dhawan) ने आज मोठा पराक्रम केला.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० चौकार मारणारा पहिला भारतीय
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० चौकार मारण्याचा पराक्रम आज शिखर धवनने नावावर केला. हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला. या विक्रमात ख्रिस गेल ( ११३२), अॅलेक्स हेल्स ( १०५४), डेव्हिड वॉर्नर ( १००५), आरोन फिंच ( १००४) हे आघाडीवर आहेत.
Web Title: IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Shikhar Dhawan completed 1000 fours in T20 format, first Indian to complete the milestone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.