Mohammed Shami IPL 2022, GT vs RCB Live Updates : एक चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमीने Measure Tape मागवली; अम्पायरला ही कृती नाही आवडली!

IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 03:51 PM2022-04-30T15:51:11+5:302022-04-30T15:51:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, GT vs RCB Live Updates : Mohammed Shami had to re-measure his run-up after bowling just one delivery, Umpire Not Happy with him  | Mohammed Shami IPL 2022, GT vs RCB Live Updates : एक चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमीने Measure Tape मागवली; अम्पायरला ही कृती नाही आवडली!

Mohammed Shami IPL 2022, GT vs RCB Live Updates : एक चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमीने Measure Tape मागवली; अम्पायरला ही कृती नाही आवडली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : सात विजयांसह तालिकेत १४ गुणांची कमाई करून अव्वल स्थान पटकावणाऱ्या गुजरात टायटन्सचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यात ९ सामन्यांत केवळ १० गुण आहेत आणि त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धकांचे आव्हान आहे.  गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( GT vs RCB) यांच्यातल्या आजच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोड घडली. पहिला चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) दोन वेळा क्रीजजवळ येऊन थांबला आणि त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून अम्पायरने त्याला झापलं.... 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रदीप सांगवान व साई सुदर्शन हे गुजरात टायटन्सकडून यश दयाल व अभिनव मनोहर यांच्याजागी खेळणार, तर रॉयल चॅलेंजर्सकडून आज महिपाल लोम्रोर पदार्पण करतोय, त्यासाठी सुयश प्रभुदेसाईला बसवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचा हा १००वा आयपीएल सामना आहे. RCBचा दिनेश कार्तिक आज एकूण ३००वा ट्वेंटी-२० सामना खेळत आहे.

फॉर्माशी झगडणारा विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि शमीने टाकलेला पहिला चेंडू त्याने सुरेखरित्या डिफेन्ड केला. त्यानंतर शमी गोलंदाजी करताना दोनवेळा क्रीजजवळ येऊन थांबला. त्याने लगेचच Measure Tape मागवली अन् तो रनिंगचे माप घेऊ लागला. पहिल्याच षटकात शमीच्या या वेळखाऊ वागण्यावर अम्पायरने नाराजी व्यक्त केली. माप मोजून झाल्यानंतर शमीने टाकलेल्या पुढील दोन चेंडूंवर विराटने चौकार खेचले. २०१८नंतर  पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या प्रदीप सांगवानने दुसऱ्या षटकात RCBला धक्का दिला. त्याने कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला ( ०) माघारी जाण्यास भाग पाडले.


Web Title: IPL 2022, GT vs RCB Live Updates : Mohammed Shami had to re-measure his run-up after bowling just one delivery, Umpire Not Happy with him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.