IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म आज परतलेला पाहून सारे सुखावले. कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लेट कट अन् अपर कट... असे भात्यातील सर्व फटके त्याने आज बाहेर काढले. ४५ धावांवर जीवदान मिळाले असताना विराटने आयपीएल २०२२मधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर GT चा गोलंदाज मोहम्मद शमी ( Shami) विराट जवळ आला अन् त्याच्या पाठ थोपटवून गेला. त्यानंतर शमीने पुढच्या षटकात विराटचा त्रिफळा उडवला.
RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस शून्यावर बाद झाला. २०१८नंतर पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या प्रदीप सांगवानने दुसऱ्या षटकात RCBला हा धक्का दिला. रजत पाटीदार व विराट यांनी दमदार खेळी सुरूच ठेवली. अल्झारी जोसेफच्या पहिल्याच षटकात या दोघांनी तीन चौकार खेचले. विराटने मारलेला कव्हर ड्राईव्ह लाजवाब होता. विराट आज पुर्वीच्या अंदाजात दिसला. विराटने ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे त्याचे ४३वे तर यंदाच्या पर्वातील पहिलेच अर्धशतक ठरले. पाटीदार यानेही २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराट व पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. प्रदीप सांगवानने ही भागीदारी तोडली आणि पाटीदार ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.
विराटच्या अर्धशतकानंतर शमी त्याच्या कानाजवळ येऊन काहीतरी पुटपूटला होता अन् त्यानंतर पुढील षटकात शमीने त्याला बाद केले. विराट ५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर बाद झाला. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिनेश कार्तिक ( २) राशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. RCB ने ६ बाद १७० धावांचा डोंगर उभा केला.
पाहा विराटची विकेट