बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

Yashasvi Jaiswal IPL 2022: आता या सामन्यापूर्वी बेबी गांगुलीचीही एन्ट्री झाली आहे. यासंदर्भात राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:13 PM2022-05-24T19:13:15+5:302022-05-24T19:15:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 GT vs RR qualifier 1 Yashasvi Jaiswal  becomes baby ganguli, Rajasthan Royals post the video on twitter | बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना होईल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत धडक घेईल, तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. (IPL 2022 GT vs RR qualifier 1)

आता या सामन्यापूर्वी बेबी गांगुलीचीही एन्ट्री झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात राजस्थानचा फलंदाज यशस्वी जैस्वालची तुलना गांगुलीशी करण्यात आली आहे. आरआरने हा व्हिडिओ शेअर करत, 'बेबी गांगुली ईडन गार्डन्सवर फुल फ्लोमध्ये,' असे लिहिले आहे.

यशस्वी जैस्वालच्या या व्हिडिओवर चाहते जबरदस्त कमेंट्स करत आहेत. जैस्वालच्या फलंदाजीची शैली ही हुबेहूब सौरव गांगुलीसारखीच असल्याचे काही जण म्हणत आहेत. तर जैस्वालने सौरव गांगुली अथवा सचिन तेंडुलकर ज्या प्रकारचे पॅड वापरत होते, त्याच प्रकारचे पॅड लावले आहेत, असेही काही चाहत्यांनी म्हटले आहे.

यशस्वी जैस्वाल प्लेऑफपूर्वीच जबरदस्त फॉर्मात आला आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या चार सामन्यांमध्ये तीन वेळा 40 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. जैस्वालने आयपीएल 2022 मध्ये एकूण सात सामने खेळले आहेत. यांत त्याने 30.29 च्या सरासरीने आणि 135.03 च्या स्ट्राइक रेटने 212 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतकेही ठोकली आहेत.


 

Web Title: IPL 2022 GT vs RR qualifier 1 Yashasvi Jaiswal  becomes baby ganguli, Rajasthan Royals post the video on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.