Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral 

Hardik Pandya abuses Mohammed Shami गुजरात टायटन्स ( Gujarat Titans)  इंडियन प्रीमिरअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ( Sunrisers Hyderabad) पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:02 PM2022-04-12T14:02:38+5:302022-04-12T14:03:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Gujarat Titans captain Hardik Pandya abuses Mohammed Shami ON-CAMERA, Watch Video  | Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral 

Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : गुजरात टायटन्स ( Gujarat Titans)  इंडियन प्रीमिरअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ( Sunrisers Hyderabad) पराभव पत्करावा लागला. सनरायझर्स हैदराबादने SRH ८ विकेट्स व ५ चेंडू राखून GT ने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा हा आयपीएल २०२२ मधील पहिलाच पराभव ठरला. पराभव डोळ्यासमोर दिसताना हार्दिकचा पाराही चढलेला पाहायला मिळाला आणि त्याने मोहम्मद शमीला शिविगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हार्दिक पांड्याच्या ५० धावा आणि अभिनव मनोहरच्या ३५ धावांच्या जोरावर गुजरातने ७ बाद १६२ धावा उभ्या केल्या. SRHच्या भुवनेश्वर कुमार व टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा व कर्णधार केन विलियम्सन यांनी संघाचा मजबूत पाया रचला. अभिषेक ३२ चेंडूत ४२ धावांवर माघारी परतला. राहुल त्रिपाठी १७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पण, निकोलस पूरन व विलियम्सन यांनी SRHला  विजय मिळवून दिला. विलियम्सन ४६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा करून माघारी परतला. पूरनने १८ चेंडूंत नाबाद ३४ धावा कुटल्या. एडन मार्करामनेही ८ चेंडूंत १२ धावा केल्या. 

हार्दिक पांड्याची शमीला शिविगाळ
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादच्या १३व्या षटकात हा प्रसंग घडला. १६३ धावांचा पाठलाग करताना SRH १ बाद ९७ अशा मजबूत स्थितीत होते. गुजरातला काही करून विकेट मिळवायची होती आणि पांड्याच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीची विकेट जवळपास मिळालीच होती. हार्दिकने टाकलेल्या बिमरवर त्रिपाठीने अपर कट मारला आणि चेंडू बरोबर थर्ड मॅनला उभ्या असलेल्या मोहम्मद शमीच्या पुढ्यात जाऊन पडला. शमीच्या या चूकीवर हार्दिक एवढा भडकला की त्याने ऑन कॅमेरा त्याला शिविगाळ केली.   



 

Web Title: IPL 2022: Gujarat Titans captain Hardik Pandya abuses Mohammed Shami ON-CAMERA, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.