Join us  

Hardik Pandya, IPL 2022 : अहमदाबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या, राशिद खान यांच्यासह तीन खेळाडू निवडले; तिसरं नाव जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

IPL 2022 : अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या  खेळाडूंची नावं बीसीसीआयला पाठवायची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:33 AM

Open in App

IPL 2022 : मागील ऑक्टोबर महिन्यात CVC Capital Partners ने अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले, परंतु या कंपनीचे बेटींग कंपनीत गुंतवणूक असल्याचे लक्षात आल्यानं त्यांची पुन्हा छाननी करण्यात आली. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांना बीसीसीआयनं मान्यता दिली आणि आता या फ्रँचायझीनं त्यांच्या संघात असणाऱ्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. या फ्रँचायझीनं त्यांच्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा, दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज आणि भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे या कोचिंग स्टाफमध्ये असतील. इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकी हा या संघ संचालक म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी या तिघांनी एकत्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासाठी काम केले होते.

अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या  खेळाडूंची नावं बीसीसीआयला पाठवायची आहे. दोन्ही संघांना ९० कोटी रुपयांची पर्स देण्यात आली आहे. सध्या लीगमध्ये असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडू कायम राखण्याची मुभा दिली गेली होती, परंतु अहमदाबाद व लखनौ यांना प्रत्येकी तीन खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी करारबद्ध करता येणार आहे. नव्या फ्रँचायझींना तीन खेळाडूंसाठी १५, ११ , ७ कोटी अशी रक्कम द्यावी लागणार आहे. 

ESPNcricinfo नं दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद फ्रंचायझीनं हार्दिक पांड्या व राशिद खान यांना प्रत्येकी १५ कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याकडे या संघाचे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. तिसरा खेळाडू म्हणून फ्रँचायझीनं शुभमन गिल ( Shubman Gill) ची निवड केली आहे आणि त्याला ७ कोटी दिले जातील. म्हणजेच IPL 2022 Auction मध्ये फ्रँचायझीकडे ५३ कोटी शिल्लक राहतील. प्रथमच हार्दिक आणि राशिद एकाच संघातून खेळणार आहेत. याआधी हार्दिक मुंबई इंडियन्स आणि राशिद सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळले आहेत. 

हार्दिक पांड्या - १० लाख ते १५ कोटी...  

हार्दिक पांड्याला २०१५ साली मुंबई इंडियन्सनं १० लाखांत ताफ्यात घेतले होते. २०१८नंतर तो भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून चर्चेत आला. त्यानंतर मुंबईनं त्याचवर्षी त्याला ११ कोटींत आपल्या ताफ्यात कायम राखले. हार्दिकनं आयपीएलच्या मागील दोन पर्वात २९ सामन्यांत ७६२ धावा व ३२ विकेट्स घेतल्या.   

राशिदला २०१७मध्ये हैदराबादनं ४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते, पुढच्याच पर्वात त्याला ९ कोटी देऊन संघानं कायम राखले. त्यानं ७६ सामन्यांत ९३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या मागील पाच पर्वात फक्त जसप्रीत बुमराहला ( १०४ विकेट्स) राशिदपेक्षा अधिक बळी टिपता आले आहेत. २०१८मध्ये शुभमन गिलसाठी कोलकाता नाइट रायडर्सनं १.८ कोटी मोजले होते.   

टॅग्स :आयपीएल २०२१हार्दिक पांड्याशुभमन गिलअहमदाबाद
Open in App