IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

IPL 2022 Points Table : मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:50 PM2022-05-22T23:50:16+5:302022-05-22T23:51:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 : Here is how teams finished on the points table after the end of 70 league games, Mumbai Indians finished at last position | IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Points Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब किंग्सने ( Punjab Kings) ५ विकेट्स राखून सनरायझर्स हैदराबादला ( Sunrisers Hyderabad) पराभूत केले आणि आयपीएल २०२२चा निरोप घेतला. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे काही सामने पुण्यातून मुंबईला हलवले गेले. पण, कोरोना काळातही BCCI ने महाराष्ट्रात आयपीएलच्या ७० सामन्यांच्या आयोजनाचा शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलला... 

आता क्वालिफायर १ व एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर २४ व २५ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. २४ तारखेला गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) असा क्वालिफायर १ सामना होईल. २५ तारखेला लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. त्यानंतर २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ व २९ मे रोजी फायनल सामना खेळवला जाईल. गुजरात, लखनौ या दोन नव्या संघाने पहिल्याच पर्वात प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली, तर २००८च्या विजेत्या राजस्थानसह बंगळुरूही अव्वल चौघांत आला.

साखळी फेरीनंतर कोणता संघ कितव्या स्थानी? ( IPL 2022 Points Table after league stage)

  • पाचवेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ लास्ट
  • चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यास चुकली
  • पंजाब किंग्सने सहाव्यांदा आयपीएलच्या गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले
  • गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स हे पदार्पणातच प्ले ऑफमध्ये 
  • राजस्थान रॉयल्स आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा टॉप टू मध्ये
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8वे प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. 

 

Web Title: IPL 2022 : Here is how teams finished on the points table after the end of 70 league games, Mumbai Indians finished at last position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.