हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार!

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) मोठ्या फ्रँचायझीसोबत एका वेगळ्याच भूमिकेत काम करताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:13 PM2021-12-07T16:13:19+5:302021-12-07T16:14:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: India off-spinner Harbhajan Singh to Join Support Staff of a Major Franchise | हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार!

हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) मोठ्या फ्रँचायझीसोबत एका वेगळ्याच भूमिकेत काम करताना दिसणार आहे. त्यासाठी ४१ वर्षीय हरभजन पुढील आठवड्यात निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात तेत आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) सदस्य असलेला हरभजन याला यूएईत झालेल्या टप्प्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता तो निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याला काही मोठ्या फ्रँचायझींकडून सपोर्ट स्टाफमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आहे आणि त्याबाबत तो निर्णय जाहीर करेल.

''त्याला सल्लागार, मार्गदर्शक किंवा फ्रँचायझीच्या सल्लागार समितीतील सदस्य यापैकी एक भूमिका मिळण्याची शक्यता आहे. ज्या फ्रँचायझीसोबत त्याची चर्चा सुरूय, त्यांना त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. लिलाव प्रक्रियेत तो फ्रँचायझीसोबत सहभागी होऊ शकतो,''असे सूत्रांनी PTI ला सांगितले.  युवा खेळाडूंना घडवण्यासाठी हरभजननं नेहमीच पुढाकार घेतला आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वात भज्जीनं KKRच्या वरुण चक्रवर्थीला मार्गदर्शन केलं होतं. 

हरभजन सिंगनं १०३ कसोटीत ४१७ विकेट्स, २३६ वन डे सामन्यांत २६९ व २८ ट्वेंटी-२०त २५ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २ शतकं व ९ अर्धशतकांसह २२२४ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं १६३ सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत. 
 

Web Title: IPL 2022: India off-spinner Harbhajan Singh to Join Support Staff of a Major Franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.