Join us  

Hardik Pandya : अरेरे... हार्दिक पांड्यामुळे चाहत्याला आता गमवावी लागणार नोकरी; मीम्ससाठी नेटिझन्सना मिळाला स्कोप

GT ने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य SRHने ८ विकेट्स व ५ चेंडू राखून सहज पार केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा हा आयपीएल २०२२ मधील पहिलाच पराभव ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 3:02 PM

Open in App

Hardik Pandya Mohammed Shami IPL 2022 : गुजरात टायटन्सची ( Gujarat Titans)  इंडियन प्रीमिरअर लीगमधील विजयी घोडदौड सोमवारी सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) अडवली. GT ने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य SRHने ८ विकेट्स व ५ चेंडू राखून सहज पार केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा हा आयपीएल २०२२ मधील पहिलाच पराभव ठरला. या पराभवामुळे हार्दिक पांड्याची चिडचिड झालेली पाहायला मिळाली, त्याचवेळी त्याच्या एका चाहत्याला आता नोकरी गमवावी लागणार आहे. 

हार्दिक पांड्याच्या ५० धावा आणि अभिनव मनोहरच्या ३५ धावांच्या जोरावर गुजरातने ७ बाद १६२ धावा उभ्या केल्या. SRHच्या भुवनेश्वर कुमार व टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा व कर्णधार केन विलियम्सन यांनी संघाचा मजबूत पाया रचला. अभिषेक ३२ चेंडूत ४२ धावांवर माघारी परतला. राहुल त्रिपाठी १७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पण, निकोलस पूरन व विलियम्सन यांनी SRHला  विजय मिळवून दिला. विलियम्सन ४६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा करून माघारी परतला. पूरनने १८ चेंडूंत नाबाद ३४ धावा कुटल्या. एडन मार्करामनेही ८ चेंडूंत १२ धावा केल्या. 

या सामन्यातील एक पोस्टर खूपच व्हायरल झाले. त्यावर आज जर हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावले, तर मी नोकरीवरून राजीनामा देईन, असे चाहत्याने लिहिले होते. त्याचे दुर्दैव असे की हार्दिकने या लढतीत अर्धशतक झळकावले. आता मीम्सचा पाऊस पडतोय.  

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App