राजकोट : पंजाब किंग्सचे सहमालक नेस वाडिया यांनी आगामी सत्रात दीर्घकाळ चालणारे आयपीएल सामने दोन टप्प्यात व्हायला हवे,अशी मागणी केली आहे.
बीसीसीआयने आयपीएल मीडिया अधिकारातून ई लिलावात ४८३९० कोटींची कमाई केली. मागच्या टप्प्याच्या तुलनेत ही रक्कम जवळपास तीन पट अधिक आहे. पुढील पाच वर्षांत आयपीएलचे ९४ सामने खेळले जातील. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आयसीसीच्या भविष्यातील दौरा वेळापत्रकात (एफटीपी) आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा कालावधी असेल,असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आयपीएल आयोजनाचे सत्र लांबणार हे जवळपास ठरले आहे.
वाडिया म्हणाले,‘ आयपीएलने क्रिकेटची लोकप्रियता जगभर पसरविली आहे. आवश्यक ऊर्जेचा संचार झाल्यामुळे क्रिकेट आता वैश्विक खेळ बनला.