Join us  

IPL 2022: ईशान बाहेर होणार?; मुंबईचा फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत

आमच्याविरुद्ध विरोधी संघाच्या फलंदाजांनी शतकी खेळी केली. फलंदाजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:08 AM

Open in App

मुंबई : मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईने सुरुवातीचे आठ सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ. यावर दु:खी झालेले प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी मुंबईच्या पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले. सततच्या अपयशानंतर त्यांनी फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत दिले, शिवाय सलामीवीर ईशान किशनच्या खेळाबद्दल चिंता व्यक्त केली.

रविवारी लखनौने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला.  जयवर्धने यांनी फलंदाजीमध्ये वारंवार अपयश आल्यानंतर  बदलांचे संकेत दिले आहेत. ‘मला याचा आढावा घ्यावा लागेल आणि अन्य प्रशिक्षकांशी बोलून काही योजना बनवाव्या लागतील,’ असे  फलंदाजीतील संभाव्य बदलांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले. 

 ‘आम्हाला यावर विचारमंथन करण्याची गरज आहे.  फलंदाजीत काही समस्या आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी केलेली नाही. प्रथम फलंदाजी करताना आणि लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी आल्या. या प्रकारच्या स्पर्धेत गोलंदाजीची बाजू सामन्यावर नियंत्रण ठेवते. आम्ही आमच्या क्षमतेनुसार गोलंदाजी केली नाही आणि सुरुवातीला बळी घेण्यात अपयशी ठरलो. आमच्याविरुद्ध विरोधी संघाच्या फलंदाजांनी शतकी खेळी केली. फलंदाजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे माहेला म्हणाले.’  फलंदाजीत सातत्य आणावे लागेल. आपण पुढे जात राहणे आवश्यक आहे आणि आपल्याला ते बदल करायचे असल्यास आपण ते करू,’ असेही त्यांनी संकेत दिले.

 

टॅग्स :आयपीएल २०२२इशान किशनमुंबई इंडियन्स
Open in App