नवी दिल्ली-
आयपीएल २०२२ चा सीझन मोठ्या जोशात सुरू आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल ही अशी एक लीग आहे, जिथे दमदार कामगिरी दाखवून अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघासाठी दार उघडलं आहे. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. कमाल रशीद खान (KRK) सोशल मीडियात नेहमी बॉलीवूड चित्रपटांवरील रिव्ह्यूमुळे चर्चेत असतो, परंतु यावेळी त्याने बॉलीवूड नव्हे तर क्रिकेटपटूंना लक्ष्य केलं आहे. त्यानं रिषभ पंतच्यादिल्ली कॅपिटल्सबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान (KRK) याने IPL 2022 साठी मोठी भविष्यवाणी केली आहे. "दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2022 चे विजेतेपद जिंकू शकत नाही, कारण रिषभ पंत खूप ड्रामेबाज आहे. तो विराट कोहलीसारखाच आहे. कोहली नेहमीच ड्रामा करत आला आहे आणि कधीही आयपीएलचं जेतेपद पटकावू शकलेला नाही. रिषब पंतही तेच करतो. खेळात ड्रामेबाजी चालत नाही", असं ट्विट केआरकेनं केलं आहे.
आरसीबीकडे एकही विजेतेपद नाहीआरसीबीनं आतापर्यंत आयपीएलचं एकही विजेतेपद पटकावलेलं नाही. यावेळी संघाची कमान फाफ डू प्लेसिसच्या हाती देण्यात आली आहे. संघाची फलंदाजी मजबूत दिसते. त्यांच्याकडे ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली आणि दिनेश कार्तिकसारखे स्टार फलंदाज आहेत, जे त्यांना यावेळी विजेतेपद मिळवून देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आरसीबीकडे हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज आहेत, जे कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतात.
दिल्लीकडे तरुण नेतृत्वदिल्ली कॅपिटल्सकडे रिषभ पंतच्या रुपात युवा नेतृत्व आहे. पंत फक्त २४ वर्षांचा आहे. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गेल्या मोसमात प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. तो गोलंदाजीत खूप चांगले बदल करतो. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना एक पराभव आणि एक सामना जिंकता आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या रोमांचक लढतीत दिल्लीला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.