Join us  

Kaviya Maran’s pics go viral, IPL 2022 : केन, निकोलस... कृपया काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू फुलवा!; चाहत्याची SRHला कळकळीची विनंती

सनरायझर्स हैदराबाद संघाला IPL 2022 मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत SRHला १२ धावांनी हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 4:19 PM

Open in App

सनरायझर्स हैदराबाद संघाला IPL 2022 मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत SRHला १२ धावांनी हार मानावी लागली. या सामन्यानंतर SRHची मालकीण काव्या मारन ( Kaviya Maran) हिचा फोटो व्हायरल झाला. हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनचा पडलेला चेहरा पाहून चाहते नाराज झाले आणि एकाने तर केन विलियम्सन, अब्दुल समद, निकोलस पूरन, एडन मार्कराम आदी खेळाडूंना काव्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवा अशी विनंतीच केली.  

कर्णधार लोकेश राहुल ( ६८) व दीपक हुडा ( ५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर LSG ने ७ बाद १६९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, राहुल त्रिपाठी ( ४४) व निकोलस पूरन (  ३८) यांनी संघर्ष दाखवला. केन १६ धावांवर बाद झाला. SRHला ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौच्या आवेश खानने चार विकेट्स घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.  दरम्यान, कर्णधार केन विलियम्सनने गोलंदाजांचे कौतुक केले. या सामन्यात   केन विलियम्सन म्हणाला,''मागील सामन्यापेक्षा कालच्या लढतीत चांगली कामगिरी केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी तीन विकेट्स घेतल्या आणि ही चांगली गोष्ट आहे. पण, आम्ही नंतरची भागीदारी तोडू शकलो नाही, परंतु याचं श्रेय दीपक हुडा व लोकेश राहुल यांना द्यायला हवे. त्यांनी संघाला १७० धावांपर्यंत पोहोचवले. आमच्याकडूनही काही चांगल्या भागीदारी झाल्या असत्या तर सामना जिंकता आला असता.''

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App