IPL 2022 Rinku Singh: 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, KKR च्या पराभवानंतरही रिंकू सिंहनं जिंकलं मन

IPL 2022 Rinku Singh: KKR ला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रिंकू सिंहनं आपल्या खेळीनं सर्वांचंच मन जिंकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:45 PM2022-05-19T13:45:37+5:302022-05-19T13:46:49+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2022 kkr player rinku singh wins heart in kkrs defeat vs lucknow super giants squad fans react on it social media | IPL 2022 Rinku Singh: 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, KKR च्या पराभवानंतरही रिंकू सिंहनं जिंकलं मन

IPL 2022 Rinku Singh: 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, KKR च्या पराभवानंतरही रिंकू सिंहनं जिंकलं मन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Rinku Singh: भलेही केकेआरच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी रिंकू सिंहने आपल्या सर्वोत्तम खेळीने चाहत्यांची मने जिंकली. रिंकू सिंगने १५ चेंडूत ४० धावांची खेळी खेळली आणि या खेळीत त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. एक अशी वेळ होती जेव्हा रिंकू सिंह केकेआरला विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात एविन लुईसने अप्रतिम झेल घेतला.

आऊट झाल्यानंतर रिंकू सिंह निराश दिसला, तसंच केकेआरला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रूही आले. अखेरच्या चेंडूवर केकेआरला तीन धावांची गरज होती. परंतु उमेश यादवनं अखेरच्या चेंडूचा सामना केला. परंतु गोलंदाजानं यॉर्कर टाकत त्याला बाद केलं.



अखेरच्या ओव्हरमध्ये केकेआरला २१ धावांची गरज होती. स्टोयनिसच्या पहिल्या चेंडूवर रिंकूनं चौकर ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या या खेळीनं केकेआरला विजयाच्या जवळ आणलं होतं. चौथ्या चेंडूवरही त्यानं दोन धावा केल्या.


लुईसचा कमाल कॅच
स्टॉयनिसच्या पाचव्या चेंडूवर रिंकूनं हवेत शॉट मारला. डीप बॅकवर्ड पॉईंटा असलेल्या इविन लुईसनं त्याचा कमाल कॅच घेतला. त्याचा हा कॅच पाहून सर्वच जण हैराण होते.

Web Title: ipl 2022 kkr player rinku singh wins heart in kkrs defeat vs lucknow super giants squad fans react on it social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.