Andre Russell, IPL 2022 KKR vs PBKS Live: पंजाबने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या आंद्रे रसलने रौद्र रूप धारण केलेल्या वादळासारखी खेळी केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा करून कोलकाताला १३८ धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आंद्रे रसल नावाच्या वादळाने पंजाब किंग्जला उद्ध्वस्त करून टाकलं. रसलने ३१ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या.
१३८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरूवातही खराब झाली. अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर स्वस्तात माघारी गेले. या दोघांच्या धक्क्यातून कोलकाता सावरत असतानाच राहुल चहरने एकाच ओव्हरमध्ये कोलकाताला दुहेरी धक्का दिला होता. पण त्यानंतर रसलने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. ३१ चेंडूमध्ये त्याने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत तुफान फटकेबाजी केली. त्याने ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा कुटल्या. त्याला सॅम बिलिंग्सने नाबाद २४ धावा करत अप्रतिम साथ दिली.
त्याआधी, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली. शिखर धवन (१६), लियम लिव्हिंगस्टोन (१९), राज बावा (११), शाहरूख खान (०) आणि हरप्रीत ब्रार (१४), राहुल चहर (०) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. रबाडा आणि भानुपक्षेच्या फलंदाजीने पंजाबची लाज राखली.
Web Title: IPL 2022 KKR vs PBKS Live Andre Russell stormy batting blew Punjab Kings Away
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.