Super catch Video, IPL 2022 KKR vs PBKS Live: कोलकाता विरूद्धच्या सामन्यात पंजाबने अतिशय खराब फलंदाजी केली. उमेश यादवने २३ धावांत ४ बळी घेत भेदक मारा केला. त्याच्या गोलंदाजीपुढे पंजाबचा डाव १३७ धावांतच आटोपला. वरच्या फळीत भानुका राजपक्षेने ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर कगिसो रबाडाने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत २५ धावांची भर घातली म्हणून पंजाबने कसाबसा १३० धावांचा टप्पा ओलांडला. मात्र रबाडाचा टीम साऊदी घेतला खास विशेष ठरला.
पंजाबकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कगिसो रबाडाला गोलंदाजीसाठी संघात घेतलं होतं. पण त्याने फलंदाजीतही चमक दाखवली. कगिसो रबाडाने आंद्रे रसल आणि शिवम मावी यांनी चोप दिला. रबाडाने १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत २५ धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र त्याने जेव्हा हवेत उंच फटका मारला त्यावेळी त्याचा साऊदीने अप्रतिम झेल टिपला. साऊदीच्या या झेलाचं साऱ्यांनीच कौतुक केलं. पाहा टीम साऊदीने टिपलेला झेल...
दरम्यान, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली. शिखर धवन (१६), लियम लिव्हिंगस्टोन (१९), राज बावा (११), शाहरूख खान (०) आणि हरप्रीत ब्रार (१४), राहुल चहर (०) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. रबाडा आणि भानुपक्षेच्या फलंदाजीमुळे पंजाबने १३०चा टप्पा गाठला.