IPL 2022 KKR vs PBKS Live Updates: पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाने शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) ला संघातून बाहेर केलं. त्यामुळे आता भानुका राजपक्सा किपिंग करणार असा अंदाज आहे. शेल्डनच्या जागी संघात शिवम मावीला घेण्यात आलं आहे. पंजाबच्या संघातदेखील एक मोठा बदल करण्यात आलाय. पंजाबने कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) पदार्पणाची संधी दिली असून त्याच्या जागी संदीप शर्माला संघाबाहेर करण्यात आलं आहे.
पंजाब किंग्ज: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लिव्हिंगस्टोन, बी राजपक्षे (विकेटकीपर), ओडियन स्मिथ, एस खान, आर बावा, ए सिंग, एच ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चहर.
कोलकाता नाइट रायडर्स:श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), सुनील नरिन, शिवम मावी, टीम साऊदी, यू यादव, वरूण चक्रवर्ती.
शिखर धवनकडे हजार चौकार पूर्ण करण्याची संधी
टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडू एक हजार चौकारांचा गाठलेला नाही. पण शिखर धवन मात्र १,००० चौकार पूर्ण करण्यापासून केवळ आठ चौकार दूर आहे. शिखर धवनचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात त्याने आठ चौकार मारले तर तो हजार चौकार मारणारा जगातील चौथा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.
T20 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय
शिखर धवन - ९९२
विराट कोहली - ९१७
रोहित शर्मा – ८७५
सुरेश रैना - ७७९
गौतम गंभीर - ७४७
Web Title: IPL 2022 KKR vs PBKS Live Updates Kolkata Knight Riders won toss and bowling first Star Cricketer Kagiso Rabada in Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.