Join us  

Shikhar Dhawan, IPL 2022: शिखर धवनला KKR विरूद्धच्या सामन्यात इतिहास रचण्याची 'गब्बर' संधी

दिल्लीचा 'गब्बर' फलंदाज यंदा पंजाबच्या ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 6:31 PM

Open in App

Shikhar Dhawan, IPL 2022: आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचा कर्णधार असेल तर श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करेल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा पंजाब किंग्जचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्यावर असणार आहे. कारण शिखर धवनला टी२० कारकिर्दीत एक 'गब्बर' विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडू एक हजार चौकारांचा गाठलेला नाही. पण शिखर धवन मात्र १,००० चौकार पूर्ण करण्यापासून केवळ आठ चौकार दूर आहे. शिखर धवनचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात त्याने आठ चौकार मारले तर तो हजार चौकार मारणारा जगातील चौथा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.

T20 मध्ये सर्वाधिक चौकार

ख्रिस गेल - १,१३२अॅलेक्स हेल्स - १०५४डेव्हिड वॉर्नर - १००५

T20 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय

शिखर धवन - ९९२विराट कोहली (Virat Kohli) - ९१७रोहित शर्मा (Rohit Sharma) – ८७५सुरेश रैना - ७७९गौतम गंभीर - ७४७

शिखर धवन सध्या IPL च्या इतिहासात (५,८२७) सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरा खेळाडू आहे. चालू मोसमात ६ हजार धावा पूर्ण करून ही कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरू शकतो.

टॅग्स :आयपीएल २०२२शिखर धवनपंजाब किंग्सविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App