Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video

RR ने विजयासाठी ठेवलेल्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKR ला २१० पर्यंत मजल मारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:17 PM2022-04-19T15:17:51+5:302022-04-19T15:18:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, KKR vs RR : Shreyas Iyer gets furious at Venkatesh Iyer due to miscommunication while running single Watch Video | Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video

Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) सोमवारी राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) हाय स्कोअरिंग लढतीत कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) थरारक विजय मिळवला. RR ने विजयासाठी ठेवलेल्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKR ला २१० पर्यंत मजल मारता आली. युजवेंद्र चहलने एका षटकात हॅटट्रिकसह चार  विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. पण, चहलच्या त्या षटकापूर्वी एक नाट्यमय प्रसंग घडला आणि त्यानंतर KKRच्या पटापट विकेट्स पडल्या. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या १६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि वेंकटेश अय्यरवर ( Venkatesh Iyer) तो खवळला.  

बोल्टच्या षटकातील अखेरचा चेंडू वेंकटेश अय्यरने टोलावला आणि नॉन  स्ट्रायकवर असलेला श्रेयस धावला. शिमरोन हेटमायर तो चेंडू पकडून थ्रो करेपर्यंत श्रेयस दुसरी धाव घेण्यासाठी पुढे आला होता, परंतु वेंकटेशने त्याला माघारी जाण्यास सांगितले. त्यावरून श्रेयसचा पारा चढला. दोन्ही फलंदाजांमध्ये संवादाचा अभाव जाणवलाच, शिवाय रनींग बिटविन दी विकेटही चांगली नव्हती. त्यामुळे श्रेयस संतापला अन् १७व्या षटकात चहलच्या पहिल्याच चेंडूवर वेंकटेश विकेट देऊन माघारी परतला.  



    
श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की,''युजवेंद्र चहलने सामन्याचे पारडे फिरवले. फिंचच्या फटकेबाजीमुळे सुरुवातीपासूनच आम्ही चांगल्या धावगतीसह धावा जमवत होतो. मात्र आम्ही ही लय कायम ठेवू शकलो नाही. मी अखेरपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र चहलने सारे चित्रच बदलून टाकले.

श्रेयस अय्यरने सांगितले की, आमच्या संघाने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. मात्र आम्ही ही लय कायम कायम राखू शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर ढेपाळला. अखेर कोलकात्याचा डाव १९.४ षटकांत २१० धावांवर गारद झाला. या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या युझवेंद्र चहलने ४ षटकांत ४० धावा देऊन ५ विकेट्स टिपल्या. 

Web Title: IPL 2022, KKR vs RR : Shreyas Iyer gets furious at Venkatesh Iyer due to miscommunication while running single Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.