Umesh Yadav Catch Video, IPL 2022 KKR vs RR : राजस्थान विरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने टॉस जिंकून कोलकातासाठी प्रथम गोलंदाजी निवडली. त्याचा हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज उमेश यादवने सुरूवातीचा सार्थ ठरवला. सामन्याच्या सलामीपासूनच भेदक मारा करत त्याने धावांवर अंकुश लावला. त्यामुळे तिसऱ्या षटकात धावा जमवण्याच्या गडबडीत राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला. देवदत्त पडिक्कलचा (२ धावा) उमेश यादवने टिपलेला हा झेल विशेष चर्चेत राहिला.
पहिले षटक अतिशय मोजून मापून टाकणारा उमेश डावाच्या तिसऱ्या षटकात गोलंदाजीस आला. पहिल्या दोन षटकातं केवळ ७ धावाच झाल्या असल्याने दोन्ही फलंदाजांवर दडपण होते. त्याचाच फायदा उमेशने करून घेतला. देवदत्त पडिक्कलला पायाजवळ त्याने एक चेंडू टाकला. तो चेंडू खेळणं त्याला फारसं जमलं नाही. त्याने चेंडू हळूच टोलवला. त्यामुळे चेंडू उमेश यादवच्या दिशेने आला. चेंडू वेगाने आल्यामुळे उमेशने चेंडूंच्या रेषेत हात टाकला. त्यावेळी झेल सुटतो की काय असं वाटत असतानाच त्याने अप्रतिम असा झेल घेतला आणि पडिक्कलला माघारी धाडले. पाहा व्हिडीओ-
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, किपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कर्णधार), बाबा इंद्रजित (किपर), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी
Web Title: IPL 2022 KKR vs RR Video Umesh Yadav takes superb catch after juggling act to dismiss Devdutt Padikkal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.