विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

कोलकाताने आपल्या आघाडीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले. मात्र, तरीही कोलकाताचा कोणताही बदल यशस्वी ठरला नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 08:25 AM2022-05-02T08:25:53+5:302022-05-02T08:26:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 KKR vs RR Wankhede Stadium pitch and weather report for Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals kkr lost 5 matches | विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सलग पाच पराभव पत्करलेला कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध बाजी मारत विजयी मार्गावर परतण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याच वेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेला पराभव मागे टाकून, राजस्थान संघ पुन्हा एकदा विजयी कामगिरीसह पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोलकाताला आघाडीच्या फळीकडून मोठ्या आशा असतील. व्यंकटेश अय्यरच्या निराशाजनक कामगिरीमुळे कोलकाताने आपल्या आघाडीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले. मात्र, तरीही कोलकाताचा कोणताही बदल यशस्वी ठरला नाही.  

सलग पाच पराभवांनंतर कोलकाताच्या बाद फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली असली, तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. गोलंदाजीत टीम साऊदी, उमेश यादव व सुनील नरेन प्रभावी ठरले आहेत. 

दुसरीकडे राजस्थानची फलंदाजी जोस बटलरवर अधिक अवलंबून आहे, परंतु कर्णधार संजू सॅमसनला सातत्य दाखवावे लागेल. युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर राजस्थानची गोलंदाजी अवलंबून आहे.

Web Title: IPL 2022 KKR vs RR Wankhede Stadium pitch and weather report for Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals kkr lost 5 matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.