Join us  

विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

कोलकाताने आपल्या आघाडीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले. मात्र, तरीही कोलकाताचा कोणताही बदल यशस्वी ठरला नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 8:25 AM

Open in App

मुंबई : सलग पाच पराभव पत्करलेला कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध बाजी मारत विजयी मार्गावर परतण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याच वेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेला पराभव मागे टाकून, राजस्थान संघ पुन्हा एकदा विजयी कामगिरीसह पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोलकाताला आघाडीच्या फळीकडून मोठ्या आशा असतील. व्यंकटेश अय्यरच्या निराशाजनक कामगिरीमुळे कोलकाताने आपल्या आघाडीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले. मात्र, तरीही कोलकाताचा कोणताही बदल यशस्वी ठरला नाही.  

सलग पाच पराभवांनंतर कोलकाताच्या बाद फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली असली, तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. गोलंदाजीत टीम साऊदी, उमेश यादव व सुनील नरेन प्रभावी ठरले आहेत. 

दुसरीकडे राजस्थानची फलंदाजी जोस बटलरवर अधिक अवलंबून आहे, परंतु कर्णधार संजू सॅमसनला सातत्य दाखवावे लागेल. युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर राजस्थानची गोलंदाजी अवलंबून आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स
Open in App