IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबादने उम्रान मलिकच्या ( Umran Malik) दोन षटकांत सामना फिरवला व कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर दुर्दैवीरित्या आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे व नितिश राणा यांनी KKRचा डाव सारवला होता. पण, उम्रान मलिकने एकाच षटकात या दोघांना माघारी पाठवले आणि पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर टी नटराजनने KKRच्या रिंकू सिंगला ( Rinku Singh) LBW केले अन् अम्पायरने त्याला बाद दिले. पण, तरिही रिंकू सिंग खेळपट्टीवर उभा राहिला आणि गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. ( पाहा IPL 2022 - KKR vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्को येनसेनने त्याच्या पहिल्याच षटकात KKR ला धक्का दिला. वेंकटेश अय्यरची ( ७) बॅटला चेंडू लागून यष्टींवर आदळला अन् KKR ला फलकावर १७ धावा असताना पहिला धक्का बसला. नितिश राणा आज फॉर्मात दिसला आणि त्याने सुरेख फटकेबाजी करून धावांचा वेग वाढवला. अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता, परंतु त्यानेही अधूनमधून मोठे फटके खेळले. KKR ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या.
नितिश राणा आणि अजिंक्य यांची ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी उम्रान मलिकने संपुष्टात आणली. नितिश १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते, परंतु प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, मलिकच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शशांक सिंगने सीमारेषेवर अफलातून झेल घेतना अजिंक्यला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यने ३ खणखणीत षटकार खेचले. उम्रान मलिकच्या या षटकाने KKR ला बॅकफूटवर फेकले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरलाही ( १५) त्याने बाद केले. रिंकू सिंग ( ५) पायचीत झाला. पण, त्याला त्या निर्णयाविरोधात DRS घ्यायचा होता. मात्र १५ सेकंदाची वेळ टळून गेली होती. तरीही रिंकू खेळपट्टीवर DRS साठी अडून बसला. त्याच्या बोलण्यातून त्याने DRS चा इशारा केल्याचे समजत होते. पण, खरं तर रिंकून असा कोणताच इशारा केला नाही. या सर्व गोंधळामुळे सामना काहीकाळ थांबला होता.
Web Title: IPL 2022 KKR vs SRH Live Updates : Rinku Singh after being given out, wanted to take the DRS, but the 15 seconds were over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.