Join us  

Tim Southee IPL 2022 KKR vs SRH Live Updates : टीम साऊदीची 'Rocket Catch' पाहिलीत का?; अम्पायरच्या काळजाचा चुकलेला ठोका, Video

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने उभ्या केलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरूवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:36 PM

Open in App

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने उभ्या केलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरूवात करता आली नाही. केन विलियम्सनचे अपयश ही SRH ची डोकेदुखीच बनली आहे. पॉवर प्लेमध्ये जिथे धावा करण्याचा स्कोप असतो तिथे केन संथ खेळून सहा षटकं वाया घालवताना दिसला. आजही तेच घडले. राहुल त्रिपाठीकडे धावांनी जणू पाठ फिरवलीय. SRHला पहिल्या १० षटकांत २ बाद ६६ धावा करता आल्या आहेत. त्यात टीम साऊदीने ( Tim Southee ) घेतलेला रॉकेट कॅच पाहून सारेच अवाक् झाले. अम्पायरची अवस्था तर पार वाईट झाली होती. ( पाहा IPL 2022 - KKR vs SRH  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

KKR ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या. नितिश राणा आणि अजिंक्य यांची ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी उम्रान मलिकने संपुष्टात आणली. नितिश १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला. मलिकने अजिंक्य ( २८) व श्रेयस अय्यर ( १५) यांची विकेट घेतली. रिंकू सिंगची ( ५) बॅट आज तळपली नाही. KKR चा निम्मा संघ ९४ धावांवर माघारी परतला. सॅम बिलिंग्स व आंद्रे रसेल यांनी KKR चा डाव पुन्हा रुळावर आणला. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात बिलिंग्सला ( ३४)  बाद केले.

रसेलसोबत त्याची भागीदारी ६४ धावांवर संपुष्टात आली. भुवीने ४ षटकांत २७ धावा देताना एक विकेट घेतली. टी नटराजननेही ( १-४३) व मार्को येनसेन ( १-३०) यांनी एक विकेट घेतली. उम्रानने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या २०व्या षटकात रसेलने तीन खणखणीत षटकार खेचून २० धावा जोडल्या. कोलकाताने ६ बाद १७७ धावा केल्या. रसेल २८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला.  अभिषेक शर्मा व केन विलियम्सन यांनी सावध सुरूवात केली. वर्मा अधूनमधून फटकेबाजी करत होता, तर केननं एका बाजून विकेट टिकवून ठेवली होती. पण, सहाव्या षटकात आंद्रे रसेलला गोलंदाजीला आणले आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर केनला ( ९) माघारी पाठवले. अभिषेक वर्माने सुनील नरीच्या षटकात दोन खणखणीत षटकार मारून SRHकडून संघर्ष सुरू ठेवलेला. राहुल त्रिपाठी आजतरी खेळेल अशी अपेक्षा पुन्हा फोल ठरली. टीम साऊदीने रॉकेट कॅच घेत त्रिपाठीला (९) बाद केले. राहुलने मारलेला सरळ फटका थेट साऊदीच्या दिशेनं गेला अन् त्याने चूक न करता चेंडू पकडला. साऊदीच्या मागे उभ्या असलेल्या अम्पायरचा काळजाचा ठोका मात्र चुकला होता.

 

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
Open in App