IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आयपीएल २०२२च्या प्ले ऑफसाठी आतापर्यंत गुजरात टायटन्स हा एकमेव संघ पात्र ठरला आहे. उर्वरित ३ जागांसाठी ७ संघ शर्यतीत आहेत. SRH ने सलग चार सामने गमावल्यामुळे ते या शर्यतीत काठावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागतोय. पण, आजच्या सामन्यात त्यांनी चांगले कमबॅक केलेले पाहायला मिळतेय. उम्रान मलिकने ( Umran Malik) तीन धक्के देत SRHला कमबॅक करून दिले.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची आजची लढत त्यांना जिंकावीच लागणार आहे. उमेश यादव, सॅम बिलिंग्स यांचे KKRच्या संघात पुनरागमन झाले आहे, तर SRH कडून वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजन हे दोन बदल आहेत. येनसेनने त्याच्या पहिल्याच षटकात KKR ला धक्का दिला. वेंकटेश अय्यरची ( ७) बॅटला चेंडू लागून यष्टींवर आदळला अन् KKR ला फलकावर १७ धावा असताना पहिला धक्का बसला. नितिश राणा आज फॉर्मात दिसला आणि त्याने सुरेख फटकेबाजी करून धावांचा वेग वाढवला. अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता, परंतु त्यानेही अधूनमधून मोठे फटके खेळले. KKR ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या.
नितिश राणा आणि अजिंक्य यांची ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी उम्रान मलिकने संपुष्टात आणली. नितिश १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते, परंतु प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, मलिकच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शशांक सिंगने सीमारेषेवर अफलातून झेल घेतना अजिंक्यला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यने ३ खणखणीत षटकार खेचले. उम्रान मलिकच्या या षटकाने KKR ला बॅकफूटवर फेकले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरलाही ( १५) त्याने बाद केले.