IPL 2022 MI vs LSG: आयपीएलच्या 37व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनेमुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. सलग आठव्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबईच्या संघातील कुठलाच फलंदाज समाधानकारक धावा काढू शकला नाही. बिग हिटर पोलार्डही 20 चेंडूत केवळ 19 धावा करून बाद झाला. दरम्यान, या सामन्यात पोलार्ड आणि क्रुणाल पांड्याची आगळी वेगळी दोस्ती पाहायला मिळाली.
क्रुणालने घेतली पोलार्डची किसअखेरच्या षटकात क्रुणाल पांड्याने पोलार्डला झेलबाद केले. दरम्यान, क्रुणालने पोलार्डची विकेट घेताच मैदानावर एक मजेशीर घटना घडली. शेवटच्या 6 चेंडूत मुंबईला विजयासाठी 39 धावांची गरज होती. क्रुणालच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या दीपक हुडाने त्याचा झेल घेतला. पोलार्डला बाद केल्यानंतर क्रुणाल इतका आनंदी झाला की, त्याने उडी मारुन पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले.
पोलार्डने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीयावेळी पोलार्डच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याला क्रुणालची ही कृती आवडली नाही, असे वाटते. क्रुणालने किस केल्यानंतरही पोलार्ड कोणतीही प्रतिक्रिया न देता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्याच्या शेवटच्या षटकात क्रुणालने डॅनिएल सॅमचीही विकेट घेतली आणि जयदेव उनाडकटलाही धावबाद केले.
क्रुणाल-पोलार्ड एमआयसाठी एकत्र खेळलेकृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळायचे. दोघांनी मुंबईला अनेक प्रसंगी संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. पण आयपीएल 2022 पूर्वी मुंबईने पोलार्डला कायम ठेवले आणि हार्दिक-कृणालला रिजील केले. हार्दिक पांड्या सध्या गुजरात टायटन्सचे कर्णधार आहे, तर कृणाल लखनौकडून खेळत आहे.