IPL 2022 LSG vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी पहिला विजय मिळवला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले २११ धावांचे लक्ष्य LSG ने ६ विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक ही सेट जोडी माघारी परतल्यानंतर लखनौवर पराभवाचे सावट आले होते, परंतु एव्हिन लुईस व युवा फलंदाज आयुष बदोनी यांनी तुफान फटकेबाजी केली. आयुषने मारलेल्या षटकारावर महिला प्रेक्षक जखमी झाली. सुदैवाने तिला झालेली दुखापत गंभीर नव्हती.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. लोकेश २६ चेंडूंत ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर मनीष पांडेही लगेच माघारी परतला. लखनौला ३६ चेंडूंत ७४ धावांची गजर असताना प्रेटोरियसने मोठी विकेट मिळवली. क्विंटन ४५ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महेंद्रसिंग धोनीच्या हाती झेल देऊन बसला. १९व्या षटकात शिवम दुबेला गोलंदाजीला आणले परंतु आयुष बदोनीने त्याचा पहिलाच चेंडू षटकार खेचला. दुबेच्या त्या षटकात २५ धावा मिळाल्या. बदोनीने ९ चेंडूंत १९ धावा चोपल्या. लुईस ६ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.
पाहा बदोनीचा खतरनाक षटकार...
प्रथम फलंदाजीला आलेल्या CSKचा ऋतुराज गायकवाड ( १) लगेच धावबाद होऊन माघारी परतला तरी उथप्पा व मोईन अलीने चांगली फटेकाबी केली. उथप्पा २७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ५० धावांवर LBW झाला. मोईन अली २२ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. अंबाती रायुडू व शिवम दुबेचा यांनी ६० धावांची भागीदारी केली. रायुडू २७ आणि दुबे ४९ धावांवर बाद झाला. जडेजाने ९ चेंडूंत १७ धावा केल्या. चेन्नईने ७ बाद २१० धावा केल्या. आवेश खान, रवी बिश्नोई व अँड्य्रू टाय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022 LSG vs CSK : Ayush Badoni’s six hits female spectator during Chennai Super Kings vs Lucknow Super Giants, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.