IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates :   लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:27 PM2022-03-28T23:27:05+5:302022-03-28T23:28:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs GT Live: Gujarat Titans make a winning start, beat Lucknow Super Giants by 5 wickets | IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट

IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. लखनौच्या दीपक हुडा व आयूष बदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने १५९ धावांचे लक्ष्य उभे केले. हार्दिक व  मॅथ्यू वेडने गुजरातला विजयाच्या मार्गावर ठेवले होते, परंतु दोघंही लागोपाठ माघारी परतले. लखनौचे पारडे जड वाटत असताना राहुल तेवातिया ( Rahul Tewatia) डेव्हिड मिलरसह बाजी पलटवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिनव मनोहरने सामना संपवला. गुजरातला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. 

मोहम्मद शमीने ( Mohammed Shami)  तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती. कर्णधार लोकेश राहुल ( ०) , क्विंटन डी कॉक ( ७), एव्हिन लुईस ( १०) व मनीष पांडे ( ६) हे झटपट माघार परतले. हुडा व बदोनी यांनी लखनौच्या डावाला आकार दिला आणि ६८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. हुडा ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करून माघारी परतला.  शमीने ४ षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. शमीने टाकलेल्या १८व्या षटकात बदोनीने १५ धावा कुटल्या. बदोनीने षटकार खेचून पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूंत ही खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या. 


प्रत्युत्तरात मैदानावर आलेल्या गुजरात टायटन्सना १५ धावांवर दोन धक्के बसले. शुबमन गिल ( ०) व विजय शंकर ( ४) यांना दुष्मंथा चमिराने माघारी पाठवले. त्यानंतर मॅथ्यू वेडने कर्णधार हार्दिकसह गुजरातच्या डावाला आकार देण्यास सुरूवात केली. या दोघांची ४८ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी कृणालने संपुष्टात आणली. कृणालने ११व्या षटकात भाऊ हार्दिकला बाद केले. २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३३ धावा करणारा हार्दिकचा झेल मनीष पांडेने पकडला. दीपकने पुढील षटकात गुजरातला मोठा धक्का दिला. वेड ३० धावांवर त्रिफळाचीत झाला. 

लागोपाठ दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर गुजरातचा धावांचा वेग प्रचंड मंदावला. गुजरातला ३० चेंडूंत ६८ धावा करायच्या होत्या. त्यानंतर राहुल तेवातिया व डेव्हिड मिलर यांनी हात मोकळे केले आणि दीपकने टाकलेल्या १६ व्या षटकात २२ धावा चोपल्या. रवी बिश्नोईच्या पुढच्याच षटकात तेवातियाने १८ धावा चोपल्या. आता गुजरातला १८ चेंडूंत २९ धावा करायच्या होत्या.  पण, आवेश खानने ही भागीदारी संपुष्टात आणली. मिलर २१ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला. अखेरच्या ६ चेंडूंत गुजरातला ११ धावा करायच्या होत्या आणि नवखा अभिनव मनोहर स्ट्राईकवर होता. पण, त्याने सलग दोन चेंडू चौकार खेचले. मनोहरने ७ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या, तर तेवातिया २४ चेंडूंत  ५ चौकार व २ षटकारासह ४० धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2022 LSG vs GT Live: Gujarat Titans make a winning start, beat Lucknow Super Giants by 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.