IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचे ७ फलंदाज ६७ धावांवर माघारी परतले आहेत. गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना लखनौची अवस्था खूपच वाईट केली. त्यात मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी एक सोपी विकेट गुजरातला दिली. ( पाहा IPL 2022 - LSG vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
गुजरातचे फलंदाज ज्या खेळपट्टीवर चाचपडले तेथे लखनौच्या फलंदाजांचा कस लागणार हे निश्चित होते. क्विंटन डी कॉकला ( १) यश दयालने माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद शमीने लखनौला मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार लोकेश राहुलची ( ८) विकेट घेतली. आज पदार्पण करणाऱ्या करन शर्माला ( ४) यशने बाद केले. दीपक हुडा व कृणाल पांड्या या जोडीवर लखनौला फार विश्वास होता. पण, राशिद खानच्या अप्रतिम फिरकीने कृणालला चकवले. यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने तितक्याच चपळाईने स्टम्पिंग केली. पदार्पणवीर साई किशोरने लखनौला पाचवा धक्का दिला. आयुष बदोनी ८ धावांवर यष्टीचीत झाला. लखनौचा निम्मा संघ ६१ धावांत तंबूत परतला.
मार्कस स्टॉयनिसच्या येण्याने लखनौवरील दडपण कमी होईल असे वाटत असताना दीपकसोबतचा त्याचा ताळमेळ चुकला. दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्कस रन आऊट झाला. दीपकने एक धाव पूर्ण केली, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी धावताना त्याचा पाय घसरला, परंतु तो पर्यंत मार्कस बराच पुढे आलेला आणि तो परत जाणार तोपर्यंत चेंडू साहाकडे आला. ही विकेट पाहून डग आऊटमध्ये बसलेल्या लोकेश राहुलनेही डोक्यावर हात मारला.
Web Title: IPL 2022, LSG vs GT Live Updates : A total confusion at the middle, Marcus Stoinis is run out now. LSG in massive trouble with 6 down for just 65, KL Rahul’s reaction Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.