Join us  

IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सचे 'सुपर' कमबॅक, ५५ धावांत लखनौ सुपर जायंट्सच्या ७ फलंदाजांना केले बाद 

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आज कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 9:24 PM

Open in App

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आज कमाल करून दाखवली. एकेकाळी सामना हातातून गेलेला असा वाटत असताना लखनौ सुपर जायंट्सना त्यांना जबरदस्त धक्के दिले. १ बाद ९८ धावांवरून LSGचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कागिसो रबाडा, संदीप शर्मा व राहुल चहरची दमदार कामगिरी आणि जॉनी बेअरस्टोचा बुलेट थ्रो यांनी लखनौचे बारा वाजवले. 

फॉर्मात असलेला लोकेशची बॅट आज कागिसो रबाडासमोर फेल ठरली. तिसऱ्या षटकात रबाडाच्या अप्रतिम चेंडूवर लोकेशला ( ६) यष्टीरक्षकाच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. क्विंटन व दीपक हुडा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात संदीप शर्माने ही भागीदारी संपुष्टात आणली. क्विंटन ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. शर्माने टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने बाहेर जात होता आणि त्यावर फटका मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षक जितेश शर्माच्या हाती विसावला. संदीपने कॅचची जोरदार अपील केली, पण अम्पायरने नॉट आऊट दिले. मात्र, क्विंटनने खिलाडूवृत्ती दाखवताना मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे संदीपने कौतुक केले व त्याची पाठ थोपटली.  

त्यानंतर १४व्या षटकात दीपक हुडा ( ३४) रन आऊट झाला. कृणालने चांगला फटका मारला होता आणि दोन धावा सहज निघाल्या असत्या. पण, दीपक थोडा संथ पळाला आणि सीमारेषेवरून जॉनी बेअरस्टोने बुलेट थ्रो करून दीपकला रन आऊट केले. दीपकच्या या संथ कारभारावर कृणाल भडकलेला दिसला. त्यानंतर कृणाल (७), आयुष बदोनी ( ४) व मार्कस स्टॉयनिस ( १) हे झटपट माघारी परतले. हे सर्व १८ चेंडूवर घडले. त्यानंतरही ही पडझड थांबली नाही आणि पंजाबला ८ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. रबाडाने ३८ धावांत ४, राहुल चहरने ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App