IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सपाठोपाठलखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून सडेतोड उत्तर दिले. आयपीएल २०२२मध्ये पुण्यात झालेल्या या लढतीत LSGचे गोलंदाज वरचढ ठरले आणि त्यांनी पंजाबला १५४ धावांचे लक्ष्यही पार करू दिले नाही. दुष्मंथा चमिरा ( २-१७) व कृणाल पांड्या ( २-११) यांच्या उल्लेखनीय कामगिरीला मोहसिन खान ( ३-२४) व रवी बिश्नोईची सुरेख साथ लाभली. पंजाबकडून मयांक अग्रवाल व जॉनी बेअरस्टो वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले.
प्रत्युत्तरात मयांक अग्रवालने आक्रमक सुरुवात केली, तर शिखर धवन एक बाजूने टिकून खेळला. या दोघांची पहिल्या विकेटसाठीची ३५ धावांची भागीदारी दुष्मंथा चमिराने तोडली. लोकेश राहुलने सुरेख झेल घेताना मयांकला २५ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर रवी बिश्नोईने चांगला वळण घेणारा चेंडू टाकून धवनचा ( ६) त्रिफळा उडवला आणि त्यात कृणालने भर घालत भानुका राजपक्षा ( ९) याला झेलबाद केले. जॉनी बेअरस्टो व लाएम लिव्हिंगस्टोन यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लिव्हिंगस्टोनने रवी बिश्नोईला खेचलेले दोन खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. ही जोडी तोडण्यासाठी मोहसिन खानला पाचारण करण्यात आले आणि त्याने संथ चेंडू टाकून लिव्हिंगस्टोनला ( १८) माघारी पाठवले.
बेअरस्टो हा अखेरचा आशास्थान मैदानावर होता. बिश्नोईच्या गोलंदाजीवर त्याला अम्पायरने LBW ठरवले होते, परंतु त्याने लगेच DRS घेतला अन् तो वाचला. त्यानंतर त्याने पुढील तीन चेंडूंत १० धावा केल्या. पण, १६व्या षटकात दुष्मंथा चमिराला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो ३२ धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोच्या विकेटने पंजाबचा पराभव निश्चित झाला होता. पंजाबला २४ चेंडूंत ४९ धावा करायच्या होत्या. मोहसिनने पंजाबला आणखी एक धक्का देताना रबाडा ( २) व राहुल चहर ( ४) यांना बाद केले. अखेरच्य षटकात विजयासाठी ३१ धावांची गरज असताना रिषी धवनने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा केल्या. आवेश खानला त्याने षटकार व चौकार खेचला. त्यानंतर आवेशने ४ निर्धाव चेंडू टाकून चांगले कमबॅक केले. लखनौने हा सामना २० धावांनी जिंकला.
पहिल्या डावात १ बाद ९८ धावांवरून LSGचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कागिसो रबाडा, संदीप शर्मा व राहुल चहरची दमदार कामगिरी आणि जॉनी बेअरस्टोचा बुलेट थ्रो यांनी लखनौचे बारा वाजवले. लोकेश राहुलची ( ६) विकेट घेत कागिसोने मोठा धक्का दिला. क्विंटन डी कॉक व दीपक हुडा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात संदीप शर्माने ही भागीदारी संपुष्टात आणली. क्विंटन ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. १४व्या षटकात दीपक हुडा ( ३४) रन आऊट झाला. त्यानंतर कृणाल (७), आयुष बदोनी ( ४) व मार्कस स्टॉयनिस ( १) हे झटपट माघारी परतले. ही पडझड थांबली नाही आणि पंजाबला ८ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. रबाडाने ३८ धावांत ४, राहुल चहरने ३० धावांत २ विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : Lucknow bowlers continues to do terrific job, they have defended 153 runs against power house Punjab kings batting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.