IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : मोठी बातमी; लखनौ सुपर जायंट्सच्या CEOच्या गाडीचा मुंबई-पुणे प्रवासात अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजरही जखमी

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : इंडियन  प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स  ( PBKS vs LSG) यांच्यात पुण्यात सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:14 PM2022-04-29T19:14:45+5:302022-04-29T19:31:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, LSG vs PBKS Live Updates :  Lucknow Super Giants CEO Raghu Iyer meets with car accident ahead of PBKS clash  | IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : मोठी बातमी; लखनौ सुपर जायंट्सच्या CEOच्या गाडीचा मुंबई-पुणे प्रवासात अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजरही जखमी

IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : मोठी बातमी; लखनौ सुपर जायंट्सच्या CEOच्या गाडीचा मुंबई-पुणे प्रवासात अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजरही जखमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : इंडियन  प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स  ( PBKS vs LSG) यांच्यात पुण्यात सामना रंगणार आहे. लखनौ ८ सामन्यांत ५ विजयांसह चौथ्या, तर पंजाब ४ विजयांसह ७व्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत दोन्ही संघ असले तरी लखनौचे पारडे जड आहे. सहा वर्षांनंतर लोकेश राहुल ( KL Rahul) हा पंजाब किंग्सविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने मयांक अग्रवाल व लोकेश राहुल हे दोन बालपणीचे मित्र प्रथमच एकमेकांसमोर उभे राहिले आहत. दरम्यान, या सामन्यापूर्वी लखनौच्या ताफ्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

लखनौ सुपर जायंट्सचा ताफा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना LSG चे सीईओ रघू अय्यर यांच्या गाडीचा अपघात झाला. ते LSGच्या बसच्या पाठोपाठ होते आणि त्यांच्या गाडीत गौतम गंभीरचा मॅनेजर गौरव अरोरा व राचिता बेरी हेही होते. या तिघांना किरकोळ जखम झाली असून सर्व सुरक्षित असल्याची माहिती LSG ने दिली.   


दरम्यान, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ आज ९ गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक वगळल्यास लखनौच्या संघातील मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, मोहसीन खान व आवेश खान हे गोलंदाजी करू शकतात.  

 

Web Title: IPL 2022, LSG vs PBKS Live Updates :  Lucknow Super Giants CEO Raghu Iyer meets with car accident ahead of PBKS clash 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.