Krunal Pandya vs Deepak Hooda IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : १८ चेंडू, १३ धावा अन् ५ विकेट्स; पंजाब किंग्सने फास आवळला, कृणाल पांड्या दीपक हुडावर भडकला, Video 

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : लोकेश राहुल आज अपयशी ठरल्यानंतर क्विंटन डी कॉक व दीपक हुडा यांनी लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:07 PM2022-04-29T21:07:31+5:302022-04-29T22:03:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : Lucknow Super Giants lost 5 wickets in just 18 ball and 13 runs, What a throw from Jonny Bairstow to send Deepak Hooda back, Watch Video  | Krunal Pandya vs Deepak Hooda IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : १८ चेंडू, १३ धावा अन् ५ विकेट्स; पंजाब किंग्सने फास आवळला, कृणाल पांड्या दीपक हुडावर भडकला, Video 

Krunal Pandya vs Deepak Hooda IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : १८ चेंडू, १३ धावा अन् ५ विकेट्स; पंजाब किंग्सने फास आवळला, कृणाल पांड्या दीपक हुडावर भडकला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : लोकेश राहुल आज अपयशी ठरल्यानंतर क्विंटन डी कॉक व दीपक हुडा यांनी लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. पण, पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून पुन्हा फास आवळला. यात लखनौच्या खेळाडूंकडूनही चुका झाल्या. त्यामुळे १ बाद ९८ वरून लखनौच्या डावाला गळती लागली आणि ६ बाद १११ अशी अवस्था झाली. यात दीपक हुडाची विकेट चर्चेचा कारण ठरली. कारण, या विकेटवरून सहकारी कृणाल पांड्या ( Krunal Pandya vs Deepak Hooda) हा प्रचंड रागावला.   

फॉर्मात असलेला लोकेशची बॅट आज कागिसो रबाडासमोर फेल ठरली. तिसऱ्या षटकात रबाडाच्या अप्रतिम चेंडूवर लोकेशला ( ६) यष्टीरक्षकाच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. क्विंटन व दीपक हुडा या जोडीने पंजबाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात संदीप शर्माने ही भागीदारी संपुष्टात आणली. क्विंटन ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. शर्माने टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने बाहेर जात होता आणि त्यावर फटका मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षक जितेश शर्माच्या हाती विसावला. संदीपने कॅचची जोरदार अपील केली, पण अम्पायरने नॉट आऊट दिले. मात्र, क्विंटनने खिलाडूवृत्ती दाखवताना मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे संदीपने कौतुक केले व त्याची पाठ थोपटली.  

त्यानंतर १४व्या षटकात दीपक हुडा ( ३४) रन आऊट झाला. कृणालने चांगला फटका मारला होता आणि दोन धावा सहज निघाल्या असत्या. पण, दीपक थोडा संथ पळाला आणि सीमारेषेवरून जॉनी बेअरस्टोने बुलेट थ्रो करून दीपकला रन आऊट केले. दीपकच्या या संथ कारभारावर कृणाल भडकलेला दिसला. त्यानंतर कृणाल (७), आयुष बदोनी ( ४) व मार्कस स्टॉयनिस ( १) हे झटपट माघारी परतले. हे सर्व १८ चेंडूवर घडले.

पाहा व्हिडीओ...
 
 

Web Title: IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : Lucknow Super Giants lost 5 wickets in just 18 ball and 13 runs, What a throw from Jonny Bairstow to send Deepak Hooda back, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.