IPL 2022, Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( PBKS vs LSG) यांच्यात पुण्यात सामना सुरू आहे. सहा वर्षांनंतर लोकेश राहुल ( KL Rahul) हा पंजाब किंग्सविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ आज ९ गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक वगळल्यास लखनौच्या संघातील मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, मोहसीन खान व आवेश खान हे गोलंदाजी करू शकतात.
फॉर्मात असलेला लोकेशची बॅट आज कागिसो रबाडासमोर फेल ठरली. तिसऱ्या षटकात रबाडाच्या अप्रतिम चेंडूवर लोकेशला ( ६) यष्टीरक्षकाच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. पण, पुढील षटकात क्विंटन डी कॉकने त्याला धुतले... दोन खणखणीत षटकार खेचून क्विंटनने त्याचा इरादा स्पष्ट केला. रिषी धवनने टाकलेल्या ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रबाडाकडून क्विंटनचा झेल सुटला. हा झेल अवघडच होता, तरीही रबाडाने पूर्ण प्रयत्न केला होता. लखनौला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ विकेट गमावून ३९ धावा करता आल्या. त्यातील २३ धावा या चौथ्या व पाचव्या षटकात आल्या.
क्विंटन व दीपक हुडा या जोडीने पंजबाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात संदीप शर्माने ही भागीदारी संपुष्टात आणली. क्विंटन ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. शर्माने टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने बाहेर जात होता आणि त्यावर फटका मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षक जितेश शर्माच्या हाती विसावला. संदीपने कॅचची जोरदार अपील केली, पण अम्पायरने नॉट आऊट दिले. मात्र, क्विंटनने खिलाडूवृत्ती दाखवताना मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे संदीपने कौतुक केले व त्याची पाठ थोपटली.
पाहा व्हिडीओ...