IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करता आलेली नाही. आयपीएल २०२२मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेला जोस बटलर ( Jos Buttler) पुन्हा अपयशी ठरला. आवेश खानने ( Avesh Khan) पुन्हा त्याला बळीचा बकरा बनवताना त्रिफळा उडवला. मागील सामन्यातही आवेशनेच RRच्या ओपनरची विकेट घेतली होती. ( पाहा IPL 2022 - LSG vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
लखनौ सुपर जायंट्सच्या १६ गुण झाले असले तरी त्यांना टॉप टूमध्ये कायम राहून अंतिम फेरीसाठी एक अतिरिक्त संधी हाताशी ठेवायची आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आजच्या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफचे तिकिट पक्के करण्यासह अव्वल दोनमधील स्थानही निश्चित करण्याचा LSG चा प्रयत्न आहे. लोकेश राहुलच्या संघाचा विजय व्हावा हे केवळ LSGच्या चाहत्यांनाच वाटत नाही, तर RCB, PBKS आणि DC हेही लखनौच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. आज RR ने विजय मिळवला तर या संघाचा मार्ग अधिक खडतर होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जिमी निशॅम व ओबेड मॅकॉय यांना संघात स्थान मिळाले आहे व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन व कुलदीप सेन यांना विश्रांती देण्यात आली आहे.
यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकात दोन चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु मोहसिन खान व आवेश खान यांनी त्यांच्या धावांवर अंकुश ठेवले. तिसऱ्या षटकात आवेशच्या गोलंदाजीवर उलटा फटका मारण्याच्या प्रयत्नात जोसने त्रिफळा उडवून घेतला. बटलर आज २ धावांवर बाद झाला आणि आयपीएल २०२२मधील ही त्याची निचांक कामगिरी ठरली. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १३ सामन्यांत ६२७ धावा केल्या आहेत.