IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात एक वेगळाच इतिहास रचला गेला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( RR vs LSG) या सामन्यात आर अश्विनने ( R Ashwin retire-out ) मोठा त्याग केला. आयपीएलमध्ये असा त्याग करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. देवदत्त पडिक्कल व जोस बटलर यांनी RRच्या डावाची सुरुवात करताना ४२ धावांची भागीदारी केली. बटलर १३ धावांवर बाद झाला. संजू सॅमसन व देवदत्त डाव सावरतील असे वाटत असताना लोकेशने गोलंदाजीसाठी जेसन होल्डरला आणले आणि त्याने RRच्या कर्णधार सॅमसनला ( १३) LBW कले. कृष्णप्पा गौथमने ( Krishnappa Gowtham) एकाच षटकात दोन धक्के दिले. सेट झालेल्या देवदत्तला ( २९) व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( ४) त्याने बाद केले.
राजस्थानची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली. आर अश्विन व शिमरोन हेटमायरने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संयमी खेळ केला. १८व्या षटकात हेटमायरने गिअर बदलला आणि जेसन होल्डरच्या त्या षटकात १८ धावा कुटल्या. १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विन ( २८) रिटायर्ड आऊट झाला आणि रियान पराग मैदानावर आला. आयपीएलमध्ये retire-out होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. हेटमायरने आवेश खानला दोन खणखणीत षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रियान ४ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला, तर हेटमायर ३६ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ बाद १५६ धावा केल्या.