Marcus Stoinis Kuldeep Sen  IPL 2022 LSG vs RR Live Updates : कुलदीप सेनने टिच्चून मारा केला, राजस्थान रॉयल्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला; मार्कस स्टॉयनिस फिका पडला 

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तिसऱ्यांदा धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धींना प्रथम फलंदाजीला बोलवून अर्धी लढाई जिंकल्यात जमा असे समजणाऱ्या संघांसाठी हा मोठा धडाच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:41 PM2022-04-10T23:41:08+5:302022-04-10T23:41:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs RR Live Updates :  Rajasthan Royals have defeated Lucknow Supergiants. Massive credits to the debutant Kuldeep Sen for defending 14, great start for him. | Marcus Stoinis Kuldeep Sen  IPL 2022 LSG vs RR Live Updates : कुलदीप सेनने टिच्चून मारा केला, राजस्थान रॉयल्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला; मार्कस स्टॉयनिस फिका पडला 

Marcus Stoinis Kuldeep Sen  IPL 2022 LSG vs RR Live Updates : कुलदीप सेनने टिच्चून मारा केला, राजस्थान रॉयल्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला; मार्कस स्टॉयनिस फिका पडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : आयपीएल २०२२ त पहिलाच सामना खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसने ( Marcus Stoinis) ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येताना लखनौ सुपर जायंट्सला जवळपास थरारक विजय मिळवून दिला होता. १२ चेंडूंत ३३ धावांची आवश्यकता असताना स्टॉयनिसने १९व्या षटकात १९ धावा चोपल्या. राजस्थान रॉयल्सने प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट याची ४ षटकं आधीच संपवली होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे २०वे षटक टाकण्यासाठी अनुभवी गोलंदाज नव्हता. पदार्पणवीर कुलदीप सेनने ( Kuldeep Sen) २०व्या षटकात स्ट्राईकवर स्टॉयनिस असूनही तीन चेंडू निर्धाव फेकले आणि राजस्थान रॉयल्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. 

राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला पहिल्या दोन चेंडूवर दोन धक्के बसले. ट्रेंट बोल्टने ( Trent Boult ) भन्नाट यॉर्कर टाकून  लोकेश राहुलचा ( KL Rahul Golden Duck) त्रिफळा उडवला.  लोकेशची ही विकेट पाहून चाहत्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीने टाकलेला भारी यॉर्कर आठवला. पुढच्याच चेंडूवर बोल्टने LSGला आणखी एक धक्का देताना कृष्णप्पा गौथमलाही माघारी पाठवले.  आयपीएलच्या एकाच पर्वात दोन वेळा गोल्डन डकवर होण्याची लोकेशची ही पहिलीच वेळ ठरली.  त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने चौथ्या षटकात जेसन होल्डरला ( ८) बाद करून LSG ची अवस्था ३ बाद १४ अशी केली. 


क्विंटन डी कॉक एकतर्फी खिंड लढवत होता, परंतु त्याला साथ मिळत नव्हती. दीपक हुडा ( २५) काही काळ खेळपट्टीवर उभा राहिला, परंतु पदार्पणवीर कुलदीप सेनने त्याचा त्रिफळा उडवला. आयुष बदोनीला RRचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने माघारी पाठवल्यानंतर LSGचा निम्मा संघ ७४ धावांवर तंबूत परतला होता. हेटमायरचा सोपा झेल सोडून लखनौ सुपर जायंट्ससाठी खड्डा खणणारा कृणाल पांड्या मैदानावर आला. लखनौला ५ षटकांत विजयासाठी ६९ धावा करायच्या होत्या. चहलने १६व्या षटकात RRला मोठे यश मिळवून दिले. चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला अन् तो ३९ धावांवर रियान परागच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चहलने त्या षटकात कृणाल पांड्याचा ( २२) त्रिफळा उडवला. 


पुढील षटकात त्याने दुष्मंथा चमिराला LBW केले आणि आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेणारा तो सहावा गोलंदाज बनला. ( Chahal becomes 6th bowler to take 150 wickets in IPL) ड्वेन ब्राव्हो ( १७३), लसिथ मलिंगा ( १७०), अमित मिश्रा ( १६६), पीयुष चाला ( १५७) व हरभजन सिंग ( १५०) यांनी हा पराक्रम केला आहे. मार्कस स्टॉयनिसने १२ चेंडूंत विजयासाठी ३४ धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाच्या १९व्या षटकात दोन षटकार व १ चौकारासह १९ धावा चोपल्या. आता ६ चेंडूंत त्यांना केवळ १५ धावा करायच्या होत्या आणि RR कडे पदार्पणवीर कुलदीप सेनचा पर्याय राहिला होता. त्याने विश्वास सार्थ ठरवताना केवळ ११ धावाच दिल्या आणि राजस्थानला ३ धावांनी विजय मिळवून दिला. लखनौला ८ बाद १६२ धावांवर समाधानी रहावे लागले. स्टॉयनिस १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, देवदत्त पडिक्कल व जोस बटलर ( १३)  यांनी RRच्या डावाची सुरुवात करताना ४२ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ( १३)  LBW झाला. कृष्णप्पा गौथमने त्यानंतर देवदत्तला ( २९) व  रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( ४) त्याने बाद केले. राजस्थानची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली. आर अश्विन व शिमरोन हेटमायरने पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विन ( २८) रिटायर्ड आऊट झाला आणि रियान पराग मैदानावर आला. आयपीएलमध्ये retire-out होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. हेटमायरने आवेश खानला दोन खणखणीत षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रियान ४ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला, तर हेटमायर ३६ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ बाद १५६ धावा केल्या.
 

Web Title: IPL 2022 LSG vs RR Live Updates :  Rajasthan Royals have defeated Lucknow Supergiants. Massive credits to the debutant Kuldeep Sen for defending 14, great start for him.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.