Join us  

Trent Boult KL Rahul IPL 2022 LSG vs RR Live Updates : ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला,  गर्लफ्रेंड Athiya Shettyचा चेहरा पडला, Video 

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला पहिल्या दोन चेंडूवर दोन धक्के बसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 10:16 PM

Open in App

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला पहिल्या दोन चेंडूवर दोन धक्के बसले. ट्रेंट बोल्टने ( Trent Boult ) भन्नाट यॉर्कर टाकून  लोकेश राहुलचा ( KL Rahul Golden Duck) त्रिफळा उडवला.  लोकेशची ही विकेट पाहून चाहत्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीने टाकलेला भारी यॉर्कर आठवला. पुढच्याच चेंडूवर बोल्टने LSGला आणखी एक धक्का देताना कृष्णप्पा गौथमलाही माघारी पाठवले. या सामन्यात बॉयफ्रेंड लोकेशला चिअर करण्यासाठी आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ( Athiya Shetty )चा  चेहरा पडला. 

देवदत्त पडिक्कल व जोस बटलर ( १३)  यांनी RRच्या डावाची सुरुवात करताना ४२ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ( १३)  LBW झाला. त्यानंतर कृष्णप्पा गौथमने दोन धक्के देताना सेट झालेल्या देवदत्तला ( २९) व  रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( ४) त्याने बाद केले. राजस्थानची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली. आर अश्विन व शिमरोन हेटमायरने पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विन ( २८) रिटायर्ड आऊट झाला आणि रियान पराग मैदानावर आला. आयपीएलमध्ये retire-out होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. हेटमायरने आवेश खानला दोन खणखणीत षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रियान ४ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला, तर हेटमायर ३६ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ बाद १५६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर आलेल्या लखनौला पहिल्या दोन चेंडूवर दोन धक्के बसले. ट्रेंट बोल्टने पहिल्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून लोकेशचा त्रिफळा उडवला आणि पुढच्या चेंडूवर गौथमला LBW केले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने चौथ्या षटकात जेसन होल्डरला ( ८) बाद करून LSG ची अवस्था ३ बाद १४ अशी केली. आयपीएलच्या एकाच पर्वात दोन वेळा गोल्डन डकवर होण्याची लोकेशची ही पहिलीच वेळ ठरली. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्सअथिया शेट्टी 
Open in App