Join us  

IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाची 'बॅट' मुख्यमंत्री योगी यांच्या हाती; गौतम गंभीर, संजीव गोएंका यांच्याकडून खास भेट

आयपीएल ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने क्विंटन डी कॉक, आवेश खान, मार्क वूड, जेसन होल्डर, कृणाल पांड्या आणि दीपक हुडा आदी स्टार्सना ताफ्यात घेतले आहे. त्यांनी आधी लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले होते.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 3:42 PM

Open in App

Lucknow Super Giants gift to UP CM Yogi Adityanath - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक  संजीव गोएंका आणि मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यांनी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली हा संघ आयपीएल २०२२मध्ये मैदानावर उतरणार आहे आणि IPL 2022 Mega Auction मध्ये त्यांनी मजबूत संघबांधणी केली आहे. आयपीएल २०२२ला सुरुवात होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना संघाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली बॅट भेट म्हणून दिली.  

आयपीएल ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने क्विंटन डी कॉक, आवेश खान, मार्क वूड, जेसन होल्डर, कृणाल पांड्या आणि दीपक हुडा आदी स्टार्सना ताफ्यात घेतले आहे. त्यांनी आधी लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले होते.    संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी नावावर केली, तर CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. अहमदाबाद फ्रँचायझी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स  या नावाने, तर लखनौ फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्स या नावाने मैदानावर उतरणार आहेत.

लखनौ सुपर जायंट्स: लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिष्णोई, क्विंटन डिकॉक ( ६.७५ कोटी),  मनीष पांडे ( ४.६० कोटी), दीपक हुडा ( ५.७५ कोटी), जेसन होल्डर ( ८.७५ कोटी),  कृणाल पांड्या ( ८.२५ कोटी), मार्क वूड ( ७.५० कोटी),  आवेश खान ( १० कोटी), अंकीत राजपूत ( ५० लाख), के गौतम ( ९० लाख), दुश्मंता चमीरा ( २ कोटी), शाहबाज नदीम ( ५० लाख), मनन वोहरा ( २० लाख), मोहसीन खान ( २० लाख), एव्हिन लुईस (  २ कोटी), आयुष बदोनी ( २० लाख), कायले मेयर्स ( ५० लाख), करन शर्मा ( २० लाख), मयांक यादव ( २० लाख)  

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२२योगी आदित्यनाथगौतम गंभीर
Open in App