Join us  

Deepak Hooda Krunal Pandya Controversy, IPL 2022 Auction: दोन शत्रू एकाच संघात कसे काय खेळतील? लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने दिलं उत्तर

लखनौ संघाने कृणाल पांड्याला ८.२५ कोटी तर दीपक हुडाला ५.७५ कोटींना घेतलं विकत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:04 PM

Open in App

IPL 2022 Mega Auction मध्ये Lucknow Super Giantsने वादग्रस्त घडनांमुळे चर्चेत असलेल्या दोन विकत घेतलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू Deepak Hooda आणि डावखुरा फिरकीपटू Krunal Pandya हे दोघेही आता लखनौ संघाकडून खेळताना दिसणार आहेत. बडोदा संघात खेळताना दोघांमध्ये खूप मोठा वाद (Controversy) झाला होता. त्यानंतर कृणालने कर्णधारपद सोडले होते. आता दोघेही लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्यांच्यातील वितुष्ट संघासाठी डोकदुखी ठरू शकते असं बोललं जात आहे. पण या साऱ्या गोष्टींदरम्यान, लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने या मुद्द्यावर उत्तर दिलं.

लखनौ सुपर जायंट्सने ८ कोटी २५ लाख रुपये खर्च करून अष्टपैलू कृणाल पंड्याला आपल्या संघात घेतलं. तर दीपक हुडावर ५ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले गेले. दीपक हुडाने अलिकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर कृणाल पांड्याही भारतीय संघाकडून खेळलेला आहे. पण या दोघांमध्ये जो वाद होता त्यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या. त्या चर्चांवर गौतम गंभीरने पडदा टाकला. "मी सुद्धा बराच काळ क्रिकेट खेळलो आहे. मी ज्यांच्यासोबत खेळलो, ते सगळेच माझे मित्र नव्हते. पण आम्ही एक संघ म्हणून जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही मित्र निवडले तरी सामना जिंकता येतोच अशी शाश्वती नसते. सर्वांना चांगले वातावरण मिळाले तर सर्व काही ठीक होईल. कोणताही वाद हा संवादातून सोडवला जाऊ शकतो", असं गंभीर म्हणाला.

गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट खेळली जात असताना कृणाल आणि दीपक यांच्यात वाद झाला होता. कर्णधार कृणाल पांड्या अपशब्द वापरतो आणि धमकावतो, अशी तक्रार दीपक हुडाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, कृणाल पांड्याने हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच या वादामुळे दीपक हुडाने बडोद्याकडून खेळणे बंद केलं होतं आणि तो राजस्थानकडून खेळायला लागला होता.

 

टॅग्स :आयपीएल लिलावगौतम गंभीरक्रुणाल पांड्यालखनौ सुपर जायंट्स
Open in App