मुंबई - एंटरटेन्मेंटचा मुख्य पर्याय आता टीव्हीवरून मोबाईलवर शिफ्ट झाला आहे. काही काळापर्यंत इनडोअर एंटरटेन्मेंटसाठी लोक टीव्हीवर अवलंबून होती. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलने झपाट्याने टीव्हीचे स्थान घेण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलबाबत सर्वात उपयुक्त बाब ठरते ती म्हणजे तुम्ही मोबाईल उचलून कुठेही जाऊ शकता, त्यामुळे मनोरंजनाचे साधनही कुठेही पोहोचू शकते.
इंडियन प्रीमियर लील २०२२ची सुरुवात आज म्हणजेच २६ मार्चपासून होत आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. आयपीएल २०२२चे सर्व सामने Disney+ Hotstar आणि जियो टीव्ही अॅपवर लाईव्ह दिसणार आहेत. जर तुम्ही क्रिकेटचे फॅन्स असलात आणि तुम्हाला आयपीएलचे सामने पाहायचे असतील तर आम्ही तुम्हाला आयपीएलच्या सर्वात स्वस्त प्लॅनबाबत सांगणार आहोत. त्यामधून तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचा अॅक्सेस मिळेल.
जियोचे अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यामधून Disney+ Hotstar चे सब्स्क्रिप्शन मिळते. जर तुम्ही सर्वात किफायतशीर प्लॅनचा शोध घेत असाल तर त्यासाठी ४९९ रुपये खर्च करावे लागतील. जियोचा ४९९ रुपयांचा प्लॅन हा Disney+ Hotstarच्या एक वर्षाच्या सब्स्क्रिप्शनसह उपलब्ध आहे. यामध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लॅन २जीबी डेली डेटा ऑफर करतो. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधाही मिळते. म्हणजेच या संपूर्ण प्लॅनमध्ये युझर्सला एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. तसेच युझर्सला १०० एसएमएस प्रतिदिवस आणि अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. जियोच्या ४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमझ्ये युझर्सला Disney+ Hotstar मोबाईलचे सब्स्क्रिप्शन, जियो टीव्ही, जियो सिनेमा, जियो सिक्योरिटी आणि जियो क्लाऊडचा फ्री अॅक्सेस मिळतो.
मात्र Disney+ Hotstarचं सब्स्क्रिप्शन हे तीन प्रकारचे असते. जियो मोबाईल आमि प्रीमियम दोन प्रकारचे सब्स्क्रिप्शन ऑफर करते. मोबाईल सब्स्क्रिप्शनच्या नावावरून स्पष्ट आहे की, यामधून केवळ तुम्ही मोबाईलवरच एंजॉय करू शकाल. तर प्रीमियम सब्स्क्रिप्शन घेणारे युझर्स मोबाईल, पीसी आणि टीव्हीवर याचा वापर करू शकतात. Disney+ Hotstar सुपर पॅकसुद्धा ऑफर करते.